पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की व शिवीगाळ - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, २९ एप्रिल, २०२१

पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की व शिवीगाळ

सरकारी कामात अडथळा, तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

 

पारनेर / जलभूमी वृत्तसेवा
 
पारनेर तालुक्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे नागरिकांकडून पालन न झाल्याने पोलीस निरीक्षक घनश्याम बळप  यांनी भाजीपाला व फळ विक्री करणाऱ्या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई करत असताना भाजी विक्री करत असलेल्या आरोपीने पोलीस निरीक्षक घनश्याम बळप तसेच पोलिसांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या प्रकरणी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर येथे भाजीपाला व फळ विक्री करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस व महसूल पथकाने कारवाई केली. भाजी विक्री करणारे आरोपी सुभाष भगवंत कुलट वय - ६०, सचिन सुभाष कुलट वय - ३१, बाबाजी रामदास खोडदे वय - ४० राहणार सर्व जामगाव रोड पारनेर यांनी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून पोलीस पथक कारवाईस गेले असता हेड कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे यास धक्काबुक्की शिवीगाळ केली.
 
तसेच पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनाही धक्काबुक्की करून त्यांचे शासकीय वर्दी वरील नेमप्लेट मोडून तोडून शिवीगाळ दमदाटी करून शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण केला. त्यामुळे या तिघांवर पारनेर पोलीस स्टेशन मध्ये सत्यजित शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी ठोठावली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...