साडे चार लाखाचा गांजा जप्त, पोलीसांची कारवाई - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

साडे चार लाखाचा गांजा जप्त, पोलीसांची कारवाई

महिंद्रा बोलेरो पिकपसह ८ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
 
संदीप आसणे 
श्रीरामपूर / जलभूमी वृत्तसेवा 
 
श्रीरामपूर पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत देवकर वस्ती येथे एक इसम गांजा विक्री करण्याकरिता आला आहे बाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्याने तेथे जाऊन छापा टाकला असता ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा ४६ किलो गांजा व ४ लाख रुपये किमतीची एक महिंद्रा बोलेरो पिकप असा एकूण ८ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपी गणेश भास्कर सरोदे (वय - ३८) (रा. देवकर वस्ती वाँर्ड नंबर ७ श्रीरामपूर), याचेविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. 
 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सानप, सपोनि संभाजी पाटील, पो हे काँ जोसेफ साळवी, पो.ना. करमल, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गोसावी, राहुल नरवडे, किशोर जाधव, सुनील दिघे आदींनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...