गावगुंडांचा बंदोबस्त करा - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शुक्रवार, २३ एप्रिल, २०२१

गावगुंडांचा बंदोबस्त करा

कौडाने ग्रामस्थांची मागणी
 
विशाल कोपनर 
निंबे / जलभूमी वृत्तसेवा 
 
कर्जत तालुक्यातील कौडाने गावातील गरिबांना दोन गावगुंड नेहमीच त्रास देत आहेत. गावातील विविध विकास कामात व इतर कामांना अडथळा आणत आहेत.
 
 
जलसंधारण व इतर कामांमध्येही ते दोघे विनाकारण अडथळा आणत आहे. दररोज च्या त्रासाला ग्रामस्थ कंटाळले असुन या दोघांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. रस्ता काम व इतर कामांना अडथळा आणून गावाच्या विकासाला खीळ बसवण्याचे काम चालू आहे. जलसंधारण व इतर कामांमध्ये तो अडथळा ठरत आहेत. गुंड प्रवृत्तीच्या अशा लोकांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
 
या गावगुंडामुळे दिवसाढवळ्या लोकांना विशेषतः महिलांना वावरणे कठीण झाले आहे. पोलीस प्रशासनाने या दोघांना शोधून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे .अशा दररोज च्या त्रासाला ग्रामस्थ कंटाळले असुन या दोघांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ कर्णिक जगधने, पोपट थोरात, बाळू थोरात, संतोष सुद्रिक व गजानन सुर्यवंशी यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...