वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस

अतिवृष्टी, बोगस बियाणे, दुबार पेरणी, अवकाळी पाऊसाने शेतकरी हैराण

 

पाटोदा / नितिन भोंडवे, जलभूमी वृत्तसेवा

 

पाटोदा तालुक्यासह पिठी, निर्गुडी परिसरात १४ एप्रिल रोजी अनेक ठिकाणी वादळी वारा व अवकाळी पाऊस झाला आहे .काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपिट झाली आहे. गेली दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण झाले असून आज वीज, वाऱ्यासह, अवकाळी पावसाने सुरवात केली आहे.

 



 

पिठी परिसरात गारांचा पाऊस झाला. त्यामुळे रानातील पिकांवर त्याचा चांगलाच परिणाम होणार आहे. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात अतिवृष्टीने पिटी परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यावर्षीदेखील खरीप हंगामात अतिवृष्टी तसेच बोगस बियाणे यामुळे दुबार पेरणी करावी लागली. त्यातच गेल्या वर्षभरापासून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने मदत करावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...