शेवगांव / जलभूमी वृत्तसेवा
शेवगांव तालुक्यातील निंबेनांदुर येथील लक्ष्मण बाबा मंदीर परिसरात मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास भिवसेन विष्णू माळी आणि त्यांचे बंधू पिंटू माळी यांच्या राहत्या घराला अचानक आग लागून त्यामध्ये त्यांचे संसार उपयोगी सर्व वस्तू आणि अन्न धान्यासह कपडे, कागदपत्र सर्व जळून नष्ट झाले, दुर्दैवाने कोणतेही जीवित हानी झाली नाही.
नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात आली नाही. घटनेची माहिती कळताच सरपंच शहादेव खोसे कार्यकर्ते सह हजर झाले. तोपर्यंत संपूर्ण घराची राख रांगोळी झाली होती. पीडित कुटुंबाची भेट घेऊन घटनेची पाहणी करून कामगार तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, रेशन दुकानदार यांना घटनेची माहिती देऊन पंचनामा करण्याची विनंती करण्यात आली.
आज सकाळी प्रशासकीय पंचनामा करुन दोन्ही कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मार्फत जास्तीत जास्त मदत मिळविण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...