नेवासा / जलभूमी
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनेक जनरक्षक कार्यरत आहेत. अशी माहिती संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष आदर्श साळवे यांनी जलभूमी प्रतिनिधी शी बोलताना दिली.
साळवे यांनी पुढे म्हटले आहे की, नेवासा तालुक्यातील तेलकुडगांव येथील जनरक्षक सामाजिक संस्थेने प्रशासनाला मदत करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत व यात्रेच्या ठिकाणी आपले जनरक्षक पाठवून प्रशासनाला सहकार्य करतात. कोरोना महामारी काळातही जनतेच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मदत करीत आहेत.
समाजात आल्यानंतर एक आपला देन असतं ते म्हणजे समाज सेवा. जनसेवेच काम जनरक्षक सामाजिक संस्था करीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना कमी झाल्यावर यात्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रम, आपत्कालीन कॉल असेल अशा प्रत्येक वेळेस जनरक्षक सामाजिक संस्था कार्यरत राहते.
जनरक्षक सामाजिक संस्था पूर्ण महाराष्ट्रभर काम करत आहे. सध्या 8 जिल्ह्यांमध्ये जनरक्षक कार्यरत आहे. या जनरक्षक सामाजिक संस्थेचे जनरक्षक आहोरात्र कार्यरत आहेत.
जनरक्षक सामाजिक संस्थेचे पदे भरण्यात येत आहेत. तरी इच्छुकांनी संपर्क साधावा.असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आदर्श साळवे, ही संघटना चालवतात असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदर्श साळवे, उपाध्यक्ष सतीश काळे, सचिव जगदीश घाडगे, खजिनदार अशोक गुगळे, सदस्य सुदाम काळे यांच्या सह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...