किराणा दुकानदारासह इतरांनी पाळला कडकडीत लॉकडाऊन - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १० एप्रिल, २०२१

किराणा दुकानदारासह इतरांनी पाळला कडकडीत लॉकडाऊन

अत्यावश्यक सेवा हॉस्पीटल, मेडीकल इत्यादी वगळता सर्व दुकाने बंद


अमरापूर / प्रतिनिधी


शेवगांव तालुक्यातील अमरापुर येथील छोटे व मोठे व्यापा-यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आदेश पाळत कडकडीत लॉकडाऊन पाळल्याचे दिसून आले.


Amrapur

अत्यावश्यक सेवा हॉस्पीटल, मेडीकल इत्यादी वगळता सर्व दुकाने बंद होती. राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासुन ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यसरकारच्या आदेशानुसार लॉकडाऊन आहे. त्यानुसार शेजारील खेडे , वस्ती , गांव या ठिकाणी देखील कडकडीत लॉकडाऊन पाळला गेला. मात्र नागरिकांची सकाळी १० वाजेपर्यत अमरापुरमध्ये काही प्रमाणात गर्दी दिसत होती.


तद्तर ती गर्दी कमी झाल्याची दिसुन आली. अमरापुर गावातील तसेच शेजारील गावातील लोकांनी हा लॉकडाऊन कडकडीत  योग्य रीतीने पाळला. महाराष्ट्रामध्ये कोरोना या रोगाने अहंकार माजवलेला आहे . रुग्णाची संख्या वाढतच आहे . तरी सर्वानी योग्य ती काळजी घ्यावी.असे तालुका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...