शेवगांव - प्रतिनिधी
शेवगांव रोटरी क्लबच्या पुढाकाराने बॉम्बे मशिनरीचे संचालक सुधीर सबलोक यांनी ग्रामीण रुग्णालयच्या कोविड सेंटरला साहित्य खरेदीसाठी 50,000/- रुपयाची मदत शेवंगावचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. रामेश्वर काटे यांच्याकडे सुपुर्द केली. जनसामान्यांतून सबलोक यांचे कौतुक केले जात आहे. या मदतीमधून कोविड सेंटर साठी कॉम्प्युटर, फ्रीज , खुर्च्या , कपाट इत्यादी साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. मदत मिळून देणेसाठी रोटरीचे डॉ. भागनाथ काटे यांनी विशेष पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष किसनराव माने यांनी केले, सुत्रसंचालन डॉ. भागनाथ काटे तर आभार सेक्रेटरी बाळासाहेब चौधरी यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...