भातकुडगांव फाटा / ऑफीस प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर आज पहिलाच शनिवार असल्याने शेवगांव पोलीसांनी शेवगांव - नेवासा राज्यमार्गावरील भातकुडगांव फाटा येथे ये - जा करणाऱ्या प्रवाशांची वाहने अडवून चौकशी करण्यात आली.
चौकशीत दवाखाना व्यतिरिक्त आढळून आलेल्या व्यक्तीना पोलीस नाईक नेताजी मरकड, पोलीस कॉ.संदीप ढाकणे, पो.कॉ. अशोक लिपणे यांनी कडक सुचना दिल्या. परत विना कामाचे फिरताना आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे सांगण्यात आले. विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीलाही सज्जड दम भरला. एक व्यक्ती विना मास्क मोटारसायकल वर आढळून आला. त्याला तर अंगातील शर्ट काढायला लावून तोंडाला बाधायला लावला. विना मास्क, विना कामाचे फिरणाऱ्या लोकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. असे मत विठ्ठल फटागंरे यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी शनिवारी व रविवारी या दोन दिवसांत दवाखाने, मेडिकल, पेट्रोल पंप वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून कडक लॉकडाऊन पाळण्याच्या सुचना दिलेल्या असताना अनेक व्यक्ती प्रवास करताना दिसून आले. पोलीस कर्मचारी दिसल्यावरच नियमाची आठवण होवून तोंडाला मास्क लावला जात आहे. पोलीस प्रशासनाने प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक चौकात पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून नाकाबंदी करणे गरजेचे आहे. अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त आढळणाऱ्या व्यक्तीवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.अशी मागणी जोर धरत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...