शेवगांव
स्व.सखाराम बाळा पाटील आगळे सेवा भावी संस्थेच्या माध्यमातुन इमारत व इतर बांधकामासाठी कामगारासाठी कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजना शेवगांव तालुक्यातील कामगारांसाठी प्राधान्य क्रमाने राबविणार असल्याची माहिती नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष अशोकराव देवढे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी कामगार कल्याणकारी मंडळाच्या अनेक योजना असुन त्या योजना अजुन कामगारापर्यंत पोहचल्या नाहीत. त्या पोहचण्याचे काम स्व . सखाराम बाळा पाटील आगळे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातुन राज्यातील संपुर्ण कामगारापर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट असुन हे उद्दीष्ट पुर्ण करण्यासाठी व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी या संस्थेच्या माध्यामातुन शेवगांव तालुका अध्यक्ष म्हणुन जोहरापूरचे माजी सरपंच अशोकराव देवढे यांची निवड करण्यात आली.
या निवडीचे पत्र नुकतेच स्व.सखाराम बाळा पाटील आगळे सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष दिपक सोपानराव आगळे पाटील यांनी दिले.
या निवडीबद्दल शेवगांव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील, तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव, प्रहारचे तालुका अध्यक्ष संदिपराव बामदळे, भातकुडगांव चे माजी सरपंच राजेश फटागंरे, मुकुंद जमधडे, भायगाव चे माजी सरपंच राजेंद्र आढाव, सतीश पवार, संजय पवार यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...