उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांची भातकुडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, ८ एप्रिल, २०२१

उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांची भातकुडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावातील कोरोना परीस्थिती चा आढावा


भातकुडगाव


शेवगाव पाथर्डी तालुका उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण यांनी शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी केकाण यांनी विविध समस्याबाबत येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून कोरोना परिस्थिती बाबतचा सविस्तर आढावा घेतला.

 

bhatkudgaon prathamik aarogya kendra

लसीकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंत भातकुडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 976 कोरोना व्हॅक्सीन डोस दिले असुन अजून जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना लस कशी देता येईल याबाबत सूचना दिल्या. यावेळी अव्वल कारकून  नितिन बनसोडे उपस्थित होते.


शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे दुकानदारांकडून पालन होते की नाही याची गावांमध्ये भेट देऊन  पाहणी केली. यावेळी पोलीस पाटील सुनील घुमरे, कामगार तलाठी गणेश लोखंडे, बापू वाघमोडे आदी उपस्थित होते.

 

सलीम शेख

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...