रांजणी येथे झोपडीला पक्षाचा झेंडा उभारुन भारतीय जनता पार्टी चा वर्धापन दिन साजरा - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

रांजणी येथे झोपडीला पक्षाचा झेंडा उभारुन भारतीय जनता पार्टी चा वर्धापन दिन साजरा

दहिगाव ने, रांजणी, मठाचीवाडी बुथ प्रमुखांची उपस्थिती


शेवगांव


भारतीय जनता पार्टी या पक्षाची 1951 साली स्थापना झाली. हे लावलेले रोप तळागाळापर्यंत पोहचून त्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. आम्ही त्याचा एक भाग आहोत याचा अभिमान आहे अशी प्रतिक्रिया भाजपा कार्यकर्ते लक्ष्मण काशिद यांनी व्यक्त केली.


bjp

सत्ता हे साध्य नसून साधन आहे. अंत्योदय सर्वांचा विकास,सशक्त व संस्कारित-वैचारिक  भारत हे ध्येय  सर्वांनी समोर ठेवले. त्यामुळे पक्षाला यश मिळाले.


दि. 6 एप्रिल भाजपा चा स्थापना दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्याचे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दहिगांव जि.प. गटातील कार्यकर्त्यांनी एकत्र येत रांजणी येथील झोपडीवर पक्षाचा झेंडा लावून विधिवत पुजा करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.


यावेळी दहिगांव ने गटातील भाजपा बुथ प्रमुख लक्ष्मण काशिद, आसाराम न-हे, कल्याण जगदाळे, कल्याण पवार, शरद थोटे, प्रविण भिसे, आप्पा सुकासे, मनोज काळे, रोहिदास घानमोडे, राम बोडखे, बाळासाहेब भिसे यांच्या सह दहिगाव ने, रांजणी, मठाचीवाडी, बुथ प्रमुख भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...