व्यावसायिकांचा मिनी लॉकडाऊनला विरोध, कोरोनोचे नियम पाळू पण व्यवसाय करण्यास परवानगी द्या - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, ६ एप्रिल, २०२१

व्यावसायिकांचा मिनी लॉकडाऊनला विरोध, कोरोनोचे नियम पाळू पण व्यवसाय करण्यास परवानगी द्या

बंद दुकाना समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी केला निर्णयाचा निषेध, नाभिक समाजाच्या तरुणांचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल


अहमदनगर


अहमदनगर येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारने केलेल्या मिनी लॉकडाऊनला मंगळवारी बंद दुकान समोर उभे राहून व्यापारी व कामगारांनी विरोध दर्शविला. तर या निर्णयाचा निषेध नोंदवून सोमवार ते शुक्रवार सर्व नियमांचे पालन करुन व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली.

 

lockdownla virodh

यावेळी मोची गल्लीतील दुकान मालक व कामगार फिजीकल डिस्टन्ससह नियमांचे पालन करुन उपस्थित होते. शहरातील एका नाभिक समाजाच्या तरुणांनेही दुकान चालू ठेवणार असल्याची भूमिका घेवून विरोध केल्यास वस्ता-याने नस कापून आत्महत्या करीन असा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने मिनी लाँकडाऊनला व्यावसायिकांचा विरोध असल्याचे समोर आले आहे.


गेल्या वर्षी झालेल्या टाळेबंदीमुळे व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. हळहळू अर्थचक्र रुळावर येत असताना पुन्हा मिनी लॉकडाऊनच्या नावाखाली लॉकडाऊनच करण्यात आले आहे. शहरातील कापड बाजार, मोची गल्ली ही मुख्य बाजारपेठ आहे. यामध्ये विविध दुकाने असून, हजारो कामगार आपला उदरनिर्वाह करीत आहे.


राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तू वगळून सर्व  दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इतर दुकानातील व्यापार्‍यांच दिवाळ निघणार आहे. तर या दुकानात काम करणारे हजारो कामगारांचा रोजगार हिरावला जाणार आहे. कोरोनाची साखळी बाजारपेठा बंद करुन तुटणार आहे का? हा प्रश्‍न उपस्थित करुन यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थचक्र बिघडणार असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी व्यक्त केली.


सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजे पर्यंत व्यापार्‍यांना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करु देण्याची मागणी करण्यात आली आहे. शनिवार व रविवारच्या टाळेबंदीत व्यापारी स्वत:हून बंद ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामध्ये प्रशासन काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...