तरुणाईवर मोबाईल युगाचा कमालीचा पगडा - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

सोमवार, १२ एप्रिल, २०२१

तरुणाईवर मोबाईल युगाचा कमालीचा पगडा

तरुणाई सोशल मिडियात हरपली

 

नेवासा / जयकिसन वाघ 

 

मोबाईल आता गरजेची वस्तू बनली असून या मोबाईल ने अवघे जनजीवन व्यापून टाकले आहे.आजच्या काळात मोबाईल गरजेचे रूपांतर व्यसनात कधी झाले हे आपल्याला कळलेच नाही.

 



 

 

मोठ्यापासून लहानांपर्यंत त्याची सवय जडून गेलेली आहे. आणि सध्या तरुण पिढीवर त्याचे खूप दुष्परिणाम आपल्याला पहावयास मिळत आहे. यातूनच सोयींपेक्षा हा मोबाईल आजच्या तरुण पिढीचे जगणे हैराण करून टाकताना दिसतेय.सध्या ज्याच्या त्याच्या हातात एक नव्हे तर दोन ते तीन मोबाईल दिसत असून तरुणाई तर चॅटिंग वर काय व्यस्त दिसत आहे. कॉलिंगसाठी एक साधा मोबाईल तर ऑनलाइन चॅटिंगसाठी वेगळा अँड्रॉईड मोबाइल असे दोन मोबाईल वापरले जात आहेत.

 

कॉलिंगचा बॅलन्स असणारे एक व इंटरनेट पॅक असणारी एक तसेच नवीन ऑफर असणारे अशी तीन सिम कार्ड एकट्या वापरणाऱ्याची नवीन क्रेज तरुणांईमध्ये सध्या आली आहे. सध्या सर्वत्र मोबाइल युगाचा पगडा दिसत असून तरुणाई तर चॅटिंग मध्येच हरवून गेली आहे. हे चॅटिंग आता सामाजिक समस्या म्हणून उदयास आली आहे. त्यामुळे चॅटिंग करणाऱ्याच्या घराघरातील स्वास्थ्य हरवून गेले असून पालकवर्ग या 'युवा' च्या आयुष्याबाबत 'गॅस' वर राहिला आहे. जिल्ह्यात सध्या 'नेट' वापरणाऱ्या नेट कर यांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोरोना काळात तर त्यामध्ये आणखीनच भर पडलेली दिसत आहे.याबाबत सविस्तर बातमी वाचा उद्याच्या जल भूमी अंकात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...