ढोरजळगांव
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत ढोरजळगाव ने ता. शेवगाव येथे तीन दिवस महिला सक्षमीकरण, गरिबी निर्मुलन, शाश्वत उपजिवीका बळकटीकरण व महिलांची समुह बांधणी यासाठी कनिष्ठ वर्धिनी ग्रामफेरीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गावातील अनुसुचित जाती जमाती व इतर महिलांचे कौटुंबिक सर्वेक्षण करुन महिला गटाची स्थापना करण्यात आली.
सरपंच गौरी उकीर्डे, उपसरपंच प्रतिभा कराड, मंगल कराड, लिला उकिर्डे, अश्विनी कराड, मंगल माळी, शिला साके, राजश्री माळी, ग्रामसेवक पिसोटे मँडम, अनंता उकिर्डे, गणेश कराड आदी उपस्थित होते. महिलांच्या सर्वेक्षणासाठी तीन दिवस गावात निवासी राहून अमरावती येथील जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या ज्योती तांबडे, मिना दुपारे, शारदा ब्राम्हणे व सोनाली डोईफोडे या वर्धिनी ताईंनी गावातील महिलांच्या उत्पन्नानुसार वर्गवारीचे व गट बांधणीचे काम केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...