पैठण / किरण काळे
पैठण शहरालगतच असणाऱ्या जुने कावसान येथिल गोदावरी पाञातून यारी व केनीच्या सहाय्याने वाळु उत्खनन करणाऱ्या विरूद्ध थेट गोदावरी पाञात जाऊन वाळु काढण्या कामी लावलेल्या चार लोखंडी केनी, दोरखंड, लोखंडी वायरोप असा सुमारे पन्नास हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत पोलीसांनी कारवाई केली होती. त्या पाठोपाठ पैठण पोलीसांनी आज शहरातील मटका बुकीवर गुन्हा दाखल करत कारवाई केल्यामुळे अवैद्य धंद्यावाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले असुन ते सध्या भुमिगत झाले आहेत.
पैठण शहरात जुने तहसील परिसरात एक इसम मटका जुगार घेत असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील यांच्या आदेशाने प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर पवार, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, बालोदे, वैद्य यांनी छापा टाकून सदर इसमाला ताब्यात घेऊन २२४० रु चा मुद्देमाल जप्त करून मटका घेणाऱ्या इसम नामे नासिरोद्दीन सेफोद्दीन शेख (वय ४५ )रा.इमलीपर मोहल्ला पैठण तसेच सदर मटक्यातील मुख्य बुकी आयुब पठाण, आबेद पठाण व गोरख लिंबोरे यांचे विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...