नेवासा
साखर कारखाना ग्रामीण भागातील अर्थकारणाचे एक चाक असून या चाकाला गती देण्याचे काम आपण करणार असून शेवगाव नेवासा तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे काम लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याची प्रतिक्रिया नियुक्ती नंतर नुतन तज्ञ संचालक डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीत अग्रेसर असलेल्या लोकनेते मारुतरावजी घुले पाटील संत ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना तज्ञ संचालक पदी शेवगाव तालुका पंचायत समिती सभापती डॉ क्षितिज नरेंद्रजी घुले पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
नेवासा तालुक्यातील भेंडा ( ज्ञानेश्वर नगर ) येथील कारखाना स्थळावर आयोजित नुतन संचालक मंडळाची सभा शनिवार दि .27 फेब्रुवारी रोजी नुतन अध्यक्ष शेवगाव नेवासा तालुक्याचे माजी आमदार नरेंद्रजी घुले पाटील यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी कारखाना संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील , उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग , संचालक अॅड देसाई देशमुख , विठ्ठलराव लंघे , काकासाहेब शिंदे , पंडितराव भोसले , प्रा.नारायण म्हस्के , भाऊसाहेब कांगुणे , जनार्धन कदम , शिवाजी कोलते , मच्छिद्र म्हस्के , बबनराव भुसारी , सखाराम लव्हाळे , दीपक नन्नवरे , लक्ष्मण पावसे ,काशिनाथ नवले , अशोकराव मिसाळ , विष्णू जगदाळे , कार्यकारी संचालक अनिल शेवाळे , कामगर संचालक सुखदेव फुलारी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
या संचालक मंडळाच्या मान्यतेने डॉ. क्षितिज घुले पाटील यांच्या फेरनियुक्ती ला हिरवा कंदील देण्यात आला. निवडीबद्दल शेवगाव नेवासा पाथर्डी तालुक्यातील सहकारी क्षेत्रातुन व परीसरातुन अभिनंदन होत आहे.

Jalbhumi वरील बातम्या नक्की वाचा...
उत्तर द्याहटवा