आखतवाडे / प्रतिनिधी
कोविड- १९ चा धुमाकूळ सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी उलटून गेला. डिसेंबर ते जानेवारी रूग्णांची संख्या कमी झाल्याने लग्न सराई, अखंड हरिनाम सप्ताह चांगल्यापैकी चालू झाले होते.
लोकांना कोरोणाचा विसर पडल्याने कोणीही मास्कचा वापर करत नव्हते. कदाचित रूग्णांच्या संख्येत वाढ झाली म्हणून रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर सरकारला बंदी घालावी लागली. या बंदिमुळे बॅन्ड, सनई वादक, गायक, किर्तनकार, मंडपवाले, आचारी , गोंधळी, केटरर्स यांच्या समोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे कलाकार सध्या मिळेल त्या कामावर जाऊन आपला उदर निर्वाह भागवत आहेत.
मंगल कार्यालयाच्या बांधकामासाठी लाखो रुपये कर्ज काढून बांधकाम केल्यामुळे त्यांच्या समोरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने सर्व स्तरातील लोकांचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा. सर्व कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.म्हणून मायबाप सरकार, कलाकारांचा तरी अंत बघू नका? त्यांच्या कलेचा आदर करून कलाकारांच्या कुटूबांचा उदरनिर्वाह होईल असे मानधन देण्यात यावे. अशी मागणी आखतवाडे ता. शेवगांव येथील गायक, वादक कलाकार ईश्वर वाघमारे यांच्यासह कलाकारांमधून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...