लग्न समारंभातील सत्काराला फाटा देत शिवस्मारकाला देणगी - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

रविवार, ११ एप्रिल, २०२१

लग्न समारंभातील सत्काराला फाटा देत शिवस्मारकाला देणगी

भगूरच्या सरपंचानी स्वतः च्या लग्नात ठेवला एक नविन आदर्श

 

अमरापूर / निकेत फलके 

 

आजकाल आपण अनेक तरुणाई चा अनुभव अनुभवत आहोत. तो नको त्या गोष्टीत आपला अमूल्य वेळ, पैसा खर्च करत असतात. वाढदिवस असो किंवा लग्नसोहळ्यासाठी मुला - मुलींच्या आई - वडिलांकडून मुबलक प्रमाणात खर्च केला जातो. या गोष्टीला अपवाद ठरलेत भगूर ता.शेवगांव येथील विद्यमान सरपंच वैभव प्रदीपराव पुरनाळे.सध्या विद्यमान सरपंच असून देखील त्यांनी आपल्या जिवनातील महत्वाचा प्रसंग असतांना आपले लग्न अगदी साध्या पद्धतीने व कमी लोकांच्या उपस्थितीत पार पाडला.

 


भगुर ता. शेवगांव येथील प्रदीप गीताराम पुरनाळे यांचा मुलगा चि. वैभव तर भावीनिमगांव ता.शेवगांव येथील कचरु शेळके यांची मुलगी चि.सौ.का. कोमल यांचा शुभ विवाह नुकताच पार पडला.
( छाया - निकेत फलके )


आपल्या हातून सतत काहींना काही समाजपयोगी कार्य घडत राहावे, यासाठी त्यांची कायम काहीना काही धडपड असते. त्यांनी मागील लॉकडाऊन काळात कोविड योध्यांचा मनोधैर्य वाढावे यासाठी सकाळच्या नाष्ट्याची सोय केली होती. गरीब कुटुंबाना आर्थिक सहाय्य करत धान्य वाटप केले. अनेक सामाजिक हिताचे काम करण्यासाठी ते सतत पुढं असतात. काल देखील त्यांनी आपला विवाह एकदम साध्या पद्धतीने करत भावी नवरदेवांसमोर व समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. 

 

त्यांची स्वतःची घरची परिस्थिती जेमतेम असताना आई-वडिलांसाठी देखील एकुलता एक मुलगा असताना देखील आपल्या परिस्थितीचा कुठलाही बडेजाव न करता छोट्याखानी साखरपुड्याच्या व कुंकवाच्या कार्यक्रमात नविन आयुष्यात येणाऱ्या जोडीदारासमवेत सात फेरे घेत आपला लग्नसोहळा पार पाडला. खरं तर कुठल्याही राजकीय पक्षाचा साधा कार्यकर्ता जरी असला तरी खासदार, आमदार, राजकीय पुढारी आल्याशिवाय व सत्कार सोहळा केल्याशिवाय लग्नसोहळा पार पडत नाही. आपल्या लग्नसोहळ्यातील सत्काराला फाटा देत एक उत्तम शिवस्मारक निर्माण व्हावे. याहेतूने भावी(देवी)निमगाव येथील शिवस्मारकाला देणगी देण्यात आली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...