आदिवासी कुटुंबांना दोन हजार रुपये बँक खात्यावर जमा तर आवश्यक अन्नधान्य किट वाटप होणार
अहमदनगर । प्रतिनिधी
आदिवासी समाजासाठी असणारी खावटी योजना शासन निर्णय 26 मार्च 2021 रोजी मंजूर करून या योजनेसाठी निधी देखील वितरित झाला आहे. यासंदर्भात ऑगस्ट 2020 रोजी शासन बैठकीत खावटी योजना कार्यान्वित करण्यासाठी मान्यता मिळाली होती.
यासंदर्भात आदिवासी संघर्ष समिती जिल्हा सरचिटणीस प्रसाद शिंदे व सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून खावटी योजना आदिवासी बांधवांना लवकरात लवकर मिळण्यासाठी निवेदने देण्यात आली.
सदर योजनेच्या संदर्भात आदिवासी बांधवांनी मध्ये जनजागृती करण्यात आली.
यासंदर्भात शिंदे यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, सदर योजनेचा लाभ सर्व आदिवासी बांधवांना मिळणार आहे. मनरेगा वर एक दिवस कार्यरत असलेलेआदिवासी मजूर आदिम जमाती ची सर्व कुटुंबे , पारधी जमातीची सर्व कुटुंबे, जिल्हाधिकारी यांच्या सल्ल्याने प्रकल्प अधिकारी यांनी निश्चित केलेली गरजू आदिवासी कुटुंबे , परितक्त्या घटस्फोटीत, महिला विधवा भूमिहीन ,शेतमजूर ,अपंग व्यक्ती असलेले कुटुंब ,अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब, वैयक्तिक वनहक्क धारक कुटुंब या सर्व कुटुंबांना थेट दोन हजार रुपये रक्कम बँक खात्यावर जमा होणार आहे.
आवश्यक अन्नधान्य किट वाटप गाव, शहर पातळीवर होणार आहे. तशा सूचना स्थानिक स्वराज्य संस्थेला देण्यात आलेल्या आहेत. याबाबतीत सर्व आदिवासी समाजाच्या वतीने शासनाचे आभार मानण्यात आले आहे. सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी आदिवासी संघर्ष समिती नियमित प्रयत्न करणार आहेत. या पाठपुराव्याची मध्ये प्रसाद शिंदे, मंगेश शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश खोकले, स्वप्नील गायकवाड , योगेश गायकवाड , दिलिप पवार, व सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...