शिव भोजनालयात बोगस लाभार्थी दाखवून शासनाची फसवणूक - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १० एप्रिल, २०२१

शिव भोजनालयात बोगस लाभार्थी दाखवून शासनाची फसवणूक

भोजनालयाचा करार रद्द करा अन्यथा आंदोलन

 

नांदेड / प्रतिनिधी

 

श्यामनगर स्त्री रुग्णालय येथील अन्नपुर्णा भोजनालय कॅटर्सच्या शिव भोजनालयातून बोगस लाभार्थी दाखवून शासनाची फसवणुक होत आहे . या भोजनालयावर कारवाई करावी. अशी मागणी युवा सेना तालुका समन्वयक नकुल जैन यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

 


 

श्यामनगर येथील अन्नपुर्णा भोजनालय कॅटर्सच्या शिवभोजनालयात दररोज जवळपास ५० ते ६० लाभार्थी लाभ घेत असताना भोजनालयाचे चालक मात्र दररोज १०० लाभार्थ्यांनी भोजनाचा लाभ घेतल्याचे दाखवून शासनाला डोळ्यात दिवसाढवळ्या धुळ फेकली जात आहे . एकाच लाभार्थ्यांचे फोटो अनेकवेळा अपलोड करुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत आहे . या भोजनालयाची चौकशी करुन त्यांचा करार रद्द करावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा नकुल जैन यांनी दिला आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...