केंद्रीय पथकाची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १० एप्रिल, २०२१

केंद्रीय पथकाची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

कोरोना प्रथिबंध उपाययोजनांचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा
 
 
पाटोदा / नितिन भोंडवे
 
केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील कोरोना वरील उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या पथकाने बीड जिल्ह्यातील नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
 


 
हा आढावा घेण्यासाठी नियुक्त पथकातील सदस्य बीड जिल्ह्यात दाखल झाले. केंद्रीय पथक जिल्हा, राज्य आणि केंद्र यामधील समन्वय साधणार असल्याचे पथकातील सदस्यांनी प्रामुख्याने सांगितले. जिल्हा यंत्रणेस मदत करणे ही भूमिका राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत समस्या ची आढावा बैठक घेऊन माहिती दिली.
 
या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ४१ गावे येत आ असुन सर्व गावातील नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी होत आहे. केंद्रीय पथकासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पाटोद्याचे तसीलदार मुंडलोड सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ तांदळे सर , डॉ. काकड सर, डॉ. गुंड सर व अधिकारी कर्मचारी वर्ग, आरोग्य विभाग, स्वरातिग्रा वैद्यकीय महाविद्यालय, विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...