बोरी फाटा / भाऊ कदम
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची १९४ जयंती राहुरी तालुक्यामध्ये ठिकाणी मोठ्या उत्साहात व कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग व सर्व नियमाचे पालन करत साजरी करण्यात आली.
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजात स्त्रियांना महत्त्वाचे स्थान मिळावे, यासाठी शिक्षणाचे महत्त्व ओळखून पुणे येथे भिडे वाडा येथे पहिली महिलांसाठी शाळा सुरू केली. अनिष्ट रूढी व परंपरा बंद करून समाज सुधारण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून प्रथम शिवजयंती साजरी केली. फुले कुटुंबीयांचा त्याग व समर्पण हे आजच्या कोरोना महामारीशी लढण्यासाठी आपण सर्वांनी आदर्श व प्रेरणादायी मानावे.
राहुरी येथील महात्मा फुले उत्सव समिती व संत सावता माळी युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वांबोरी गावांमध्ये ठिक ठिकाणी मास्क वाटप करण्यात आले. यावेळी सचिन मेहत्रे, अशोकराव तुपे, सतीश फुलसौदर, दिपक साखरे, दीपक गुलदगड, शुभम धाडगे, बंटी भालके, ऋतिक डागवाले, अक्षय गुलदगड, सोमनाथ भुजबळ, कृष्णा सत्रे, ओमकार डागवाले, अनंत गोंधळी, प्रतिक लगे, तेजस राऊत, ऋषिकेश मापारी, भरत सत्रे, सोमनाथ कुऱ्हे, भाऊ येलजाळे, सुनील शिंदे, अमित कटारे, संदीप लगे, नितीन घाडगे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...