मुथ्था कुटुंबातील ३ आरोपींना १५ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी तर २ महिलांची जामिनावर सुटका
माळवाडगांव / संदीप आसने
मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पोलिसांना गुंगारा देत माळवाडगाव येथून पसार झालेल्या मूथ्था बाप-बेट्याला श्रीरामपूर तालुका पोलिसांनी दि.९ रोजी जालना जिल्ह्यातून ताब्यात घेतल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव सह परिसरातील आठ ते दहा गावातील शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून माळवाडगांव येथील मुथ्था कुटुंबीय दि. ०६ फेब्रुवारी रोजी रात्री पसार झाल्याची घटना घडली होती.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ०९ फेब्रुवारीला फिर्यादी विजय सिताराम आसने ( वय ६६ ) धंदा - शेती रा. माळवाडगाव ता. श्रीरामपुर जि.अहमदनगर यांनी श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली की, माळवडगाव येथील गेल्या २० वर्षा पासुन राहात असलेला व्यापारी १. रमेश रामलाल मुथ्था २. चंदन रमेश मुथ्था ३. गणेश रामलाल मुथ्था ४. आशा ऊर्फ अक्काबाई गणेश मुथ्था ५. चांदणी चंदन मुथ्था हे लोक माळवडगाव येथे राहुन भुसार व किराणा मालाचा व्यापार करीत असताना आरोपी यानी माळवाडगाव येथील व परिसरातील गावा मधील अनेक शेतकरी लोकाचा विश्वास संपादन करुन त्यांंना त्याचे दुकानी सोयाबीन, हरबरा, मका असा भुसार शेतमाल बाजारभावापेक्षा जादा भाव देण्याचे अमिष दाखवुन शेतकरी याना विक्री करण्यासाठी भाग पाडुन परिसरातील सुमारे १०० ते २०० शेतकरी लोकाकडुन उधारीने शेतमाल सोयाबीन खरेदी करुन शेतकरी लोकांना पैसे देण्याचा वायदा केला.
शेतकरी लोकाना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा माळवडगाव व HDFC बँक श्रीरामपुर या बँकेत रक्कम शिल्लक नसताना
खोटे चेक दिले. काही शेतकरी लोकाना वहीच्या पानावर माल विक्रीच्या वजन मापाच्या चिठठया लिहुन देवुन शेतकरी लोकाचे पैसे न देता सुमारे २ कोटी रुपयाची फसवणुक करुन दि. ०६ फेब्रुवारीच्या रात्री माळवडगाव येथुन कुटुंबासह पळुन गेले. असे फिर्यादीत म्हटले. श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन ने वरील आरोपी विरुध्द गुन्हा रजि. नंबर २१/२०२१ भा.द.वि.क. ४२०, ४०६, ४६४, ४००, ४७१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन आरोपीचे शोध घेण्यासाठी पोलीस पथके तयार करण्याच्या सुचना दिल्या.
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी आरोपीचे शोध घेण्यासाठी स्वत: तपासी अंमलदार असल्याने गुन्हयाचे गांभिर्ये ओळखुन आरोपीचे शोधकामी पो.स.ई. अतुल बोरसे, पो.हे.कॉ. नवनाथ बर्ड, पो.हे.कॉ. राजेंद्र लवाडे, पो.ना. अशोक पवार, पो.ना. प्रशात रणनवरे, पो.ना. दादासाहेब लोढे, पो.ना. आबासाहेब गोरे, पो. काँ. श्रीकांत वाबळे, पो.काँ. काकासाहेब मोरे, पो.कॉ. अनिल शेंगाळे, म.पो.कॉ. बबीता खडसे, म. पो. कॉ. वंदना पवार असे पथक तयार करुन आरोपीचा टिटवळा जि. ठाणे, बलसार नवसारी राज्य गुजरात, सिन्नर जि. नाशिक, जळगाव, धुळे व जालना या भागात शोध घेवुन दि. ०४ एप्रिल रोजी गुन्हयातील आरोपी १. गणेश रामलाल मुथ्था २.. आशा उर्फ अक्काबाई गणेश मुथ्था यांंना गणपुर ता. चोपडा जि. जळगाव येथुन अटक करुन त्याची पोलीस कोठडी रिमांड घेवुन तपास करुन आरोपी गणेश रामलाल मुथ्था यांने दिलेल्या माहितीवरुन आरोपी नंबर ५. चांदणी चंदन मुथ्या हिला बलसाने ता. साक्री जि. धुळे या गावातुन दि. ०७ एप्रिल रोजी अटक करुन तीची पोलीस कोठडी घेतली.
आरोपी यांचेकडे अधिक तपास करता मुख्य आरोपी नंबर १. रमेश रामलाल मुथ्था, २. चंदन रमेश मुथ्था हे जालना येथे असल्याची माहीती त्यांनी दिली. त्यावरुन जालना येथे दि. ०९ एप्रिल रोजी आरोपी यांना जालना येथुन ताब्यात घेण्यात आले. आरोपी यांना दि. १० एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता आरोपी १ ते ३ यांना दि. १५ एप्रिल पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आला असुन आरोपी नं ४ ते ५ यांना जामिनावर सुटका केली आहे.
आरोपी यांच्याकडून ५,८०,५०० रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे त्याचे अधिनिस्त अंमलदार पोसई अतुल बोरसे, पोहेकॉ नवनाथ बर्डे, पोहेकॉ राजेंद्र लवाडे, पोना अशोक पवार, पोना.प्रशात रणनवरे, दादासाहेब लोढे, पोना. आबासाहेब गोरे, साबरसेल श्रीरामपूर पो.ना. फुरकान शेख, पोकॉ. श्रीकांत वाबळे, पोकॉ. काकासाहेब गोरे, योकॉ. अनिल शेंगाळे, पोकॉ. संदिप पवार, मपोकों बबीता खडसे, मपोकॉ. वंदना पवार, मपोकाँ. प्रियंका शिरसाठ यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...