संत नरहरी महाराज मठात प्रथम लस घेणाऱ्या नागरिकांचा सत्कार - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १० एप्रिल, २०२१

संत नरहरी महाराज मठात प्रथम लस घेणाऱ्या नागरिकांचा सत्कार

नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध ठिकाणी कोविड लसीकरण केंद्राची सुरुवात


पैठण / किरण काळे


पैठण तालुक्यात तसेच शहरामध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने शहरातील वयोवृद्ध रहिवाशांना सरकारी दवाखान्यात येण्यासाठी अडचणी येत असल्याने नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या नेतृत्वाखाली शहरामधील विविध भागात नुकतीच लसीकरणाला सुरूवात झाली आहे. कोविड १९ ची लस सर्व केंद्रात उपलब्ध करून दिली असून, महामारीच्या संसर्गापासून बचावासाठी सरकार तर्फे देण्यात येणारी कोविड लस ही फायदेशीर ठरत आहे.

 


आतापर्यंत शहरात फक्त सरकारी दवाखाना व साई हॉस्पिटलमध्ये ४५ वर्षा वरील नोंदणी केलेल्या नागरिकांना लस देण्यात येत होती, मात्र लस नोंदणीसाठी होणारी गर्दी पाहता शहरात तीन ठीकाणी कोविड लस केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.


शहरातील तीनही लसीकरण केंद्रावर गुरुवारी सकाळ पासूनच मोफत लसीकरण मोहिमेला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नागरिक स्वतःहुन लसीकरण केंद्रावर येत होते.


त्यानिमित्ताने संत नरहरी महाराज मठातील लसीकरण केंद्राला विविध मान्यवरांनी भेट दिली. प्रभागातील प्रथम लस घेणाऱ्या नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. या वेळी शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सुरज लोळगे, डॉ.भारत चव्हाण, नगरसेवक भुषण कावसानकर, रेनुकादास गर्गे, प्रकाश चंडाले व लस घेणारी व्यक्ती अनिल गर्गे उपस्थित होते.


मी पैठणकरांना आवाहन करतो की, शहरात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. कोविड 19 ची लस सर्व केंद्रात उपलब्ध करण्यात आली असून आरोग्याच्या दृष्टीने लस पूर्ण सुरक्षित आहे. आपणही कोरोना प्रतिबंधक लस घेऊन, कोरोना विरुद्धच्या लढ्यात आपला सहभाग नोंदवावा...
सुरज लोळगे
नगराध्यक्ष
नगर परिषद पैठण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...