सुपा - प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील महेश कोल्हे यांची स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पारनेर शहर अध्यक्षपदी तर अर्जुन मुठे यांची शहर युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. निवडीचे पत्र नुकतेच अहमदनगर जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे यांनी दिले.
निवडीप्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाचे अहमदनगर युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड, पारनेर तालुकाध्यक्ष निलेश दरेकर आदि उपस्थित होते.
या निवडीबद्दल बोलताना तालुकाध्यक्ष निलेश दरेकर यांनी सांगितले की, राज्यात मराठा समाज संघटीत करण्यासाठी व तरुणांचे बेरोजगारी कमी करण्यासाठी स्वाभिमानी मराठा महासंघाची स्थापना डॉ. कृषिराज टकले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. मराठा तरुणांना दिशा देण्याचे काम संघटना करीत आहे. लवकरच मराठा जोडो अभियान घेऊन समाज एकजूट करण्याचे काम करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात मराठा समाजातील युवकांना पाठबळ देण्याचे काम संघटना करणार आहे. समाजातील वाढती बेरोजगारी हा महत्वाचा प्रश्न तरुणांचे मेळावे आयोजित करून सोडविण्याचे काम स्वाभिमानी मराठा महासंघ करेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...