शेवगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था ढासळली, अवैध धंदे बोकाळली - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १ मे, २०२१

शेवगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था ढासळली, अवैध धंदे बोकाळली

वाळू तस्करीच्या गुन्हेगारीत वाढ, पोलिस तडजोडीच्या बैठकीत मग्न, गुन्ह्याचा तपास शून्य
 
बाळासाहेब जाधव 
शेवगांव / जलभूमी वृत्तसेवा 
 
शेवगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्याने दिवसा ढवळ्या घरफोड्या, जबरी चोऱ्या, वाहनचोरी, दरोडे, रस्तालुट, वाळूतस्करी, दारू, जुगार मटक्याचे अड्डे, शेवगाव येथील हत्याकांड या सारख्या गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने लक्षनिय वाढ होऊन एकाही गुन्ह्याचा तपास लागला जात नाही, सामन्य जनता गुन्हेगारांच्या दहशतीखाली सध्या वावरत असून रक्षण करणारे पोलिस यंत्रणेने कायदा वेशीला टांगल्याने ‘’सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे बीद वाक्य फक्त कागदोपत्री दिसत आहे, गुन्हेगारीमुळे तालुक्यात बिहारीराज निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 
 
 
 
पोलिस गुन्हेगाराबरोबर आर्थिक तडजोडीसाठी बैठकात धन्यता मानण्यात मुश्गुल असतात. गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकात मोठा असंतोष निर्माण झाला आहे. शेवगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था ढासळल्यामुळे पोलिसांच्या आशीर्वादाने गुन्हेगाराचे पाळेमुळे खोलवर रोवले आहेत. काही महिन्यापूर्वी शेवगावला रुजू झालेल्या पोलिस निरिक्षकाच्या काळात तालुक्यात खऱ्या गुन्हेगारीने बाळसे धरले आहे. त्याचा आज मोठा अतिरेक होत आहे. पोलिसांची प्रतिमा गुन्हेगारांचे तारणहार अशी आज निर्माण झाली आहे, थंडावलेली व अज्ञातवासात गेलेल्या गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढल्याने तालुक्यात दिवसा ढवळ्या जबरी घरफोड्या, दुचाकी वाहनाच्या चोऱ्या, दरोडे, रस्ता लुट, वाळू तस्करी, सारख्या गुन्हेगारीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होऊन गुन्ह्याची एक मालिका सुरु आहे. 
 
अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी खुलेआम उथळ माथ्याने राजरोसपणे फिरत असूनही पोलिसाकडून ठोस कारवाई केली जात नाही, पोलिस मात्र आरोपीशी कार्यालयात आर्थिक तडजोडीसाठी नेहमी मुश्गुल असतात. अनेक गंभीर घटनेत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे, एखाद्या गंभीर झालेल्या प्रकाराबाबत जनतेच्या समाधानासाठी फक्त किरकोळ स्वरूपात गुन्ह्याची नोंद घेण्यात येत आहे. कोरोना मुळे सर्वत्र लाँकडाऊन असूनही तालुक्यात गाव तिथे अवैध देशी विदेशी दारू विक्री, जुगार, मटका, गांजा आदि अवैध धंदे बेसुमार अवैध वाळू उपसा होत आहे. शेकडो वाहन राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांच्या आशीर्वादाने अर्थपूर्ण संबधामुळे अवैध व्यवसाय खुलेआम सुरु आहेत. त्यांच्या नियंत्रण व आर्थिक वसुलीसाठी पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरिक्षकाच्या व महसूलच्या मर्जीतील काही खास पोलिसांची नियुक्ती केली आहे. 
 
असंख्य गुंडाच्या टोळ्या कार्यरत आहेत. अनेकजण दिवसा ढवळ्या स्वतजवळ गावठी कट्टे खुलेआम बाळगत आहेत, अनेक सराईत गुन्हेगाराशी पोलिसांचे लागेबांधे संबध दिसत आहेत, गुन्ह्यात वाढ होत असताना गुन्हा दाखल झाल्यानंतर एकाही घटनेचा पोलिसांना साधा तपास लागत नाही. ही एक शोकांतिका बनली आहे. पोलिस ठाणे नव्हे तर तडजोड केंद्र बनले आहे. येथील कारभार राजकीय हस्तक्षेपाने चालत असून काही राजकीय पुढारी पोलीस पोलिसांचे एजंट बनले असल्याचे नागरीकातून बोलले जात आहे. तालुक्यातील आखेगाव, ठाकूर-निमगाव , गोळेगाव, शेकटे खुर्द, हातगाव,भायगांव, बक्तरपूर, देवटाकळी, शेवगाव शहरात भर दुपारी घरफोडीच्या घटना घडल्या. तर पूर्व भागातील बोधेगाव, शेकटे, बालमटाकळी, गोळेगाव, पाठोपाठ चापडगाव येथे डॉ. दहिफळे यांच्या चोरीच्या घटनेत साडेतीन लाखाचा तर वडुले येथे अडीच लाखाचा ऐवज लंपास केला आहे. 
 
काही महिन्यांपूर्वी अधोडी येथे भरदिवसा धुमस्टाईलने महिलेला गळ्यातील मनीमंगळसूत्र लुटले. तर गदेवाडी येथे लाखोंची लूट, शेवगाव येथील दुहेरी हत्याकांड या सारख्या तालुक्यात एकापाठोपाठ एक अशा जबरी चोरी, दरोड्याच्या घटना होऊनही पोलिसांना तपास लागला जात नाही, बोधेगाव दुरक्षेत्राला नेहमी पेक्षा जास्त सात- आठ पोलीस कर्मचारी असूनही त्यांचा वचक नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. दरोड्याच्या वारंवार घटनेमुळे दरोडेखोरांची जनतेवर मोठी दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांच्या निष्क्रिय बाबत नागरिकत संताप व्यक्त होत आहे. पोलिस ठाण्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहिले नाही, उपअधिक्षक कार्यालय असूनही त्यांना जिल्हा पोलिस अधिक्षकाची मर्जी असल्याने तक्रारीचे गांभीर्य घेतले जात नाही, जनतेचे रक्षणकर्ते पोलिस जनतेवर अन्याय झाल्यास खरा न्याय दिला जात नाही. अशी अनेक उदाहरणे नेहमी घडले जातात. 
 
मात्र अर्थपूर्ण संबाधामुळे गुन्हेगारांना अभय मिळत असल्याने सामन्य जनतेला खरा न्याय मिळत नाही. तालुक्यातील जनता आज गुन्हेगारांच्या दहशतीखाली वावरत असल्याने ‘’सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ‘’ हे ब्रीदवाक्य फक्त नावापुरतेच राहिले आहे असून रक्षकच जनतेचे भक्षक बनले आहेत. अनेक गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग आढळल्याचा वास येत आहे,वाळू व्यवसायात अनेक पोलिसांची भागीदारी आहे, पोलिसांच्या मोबाइल डिटेल सखोल तपासणी होण्याची गरज आहे, गैरकृत्यामुळे जनतेत मात्र पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे जिल्हा पोलिस प्रमुखांनी लक्ष्य घालून ढासळलेला कायदा सुव्यवस्था प्रश्न मार्गी लावून सामन्य जनतेला दिलासा द्यावा. संबंधित पोलीसांच्या गैरकारभाराची खातेनिहाय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी जनतेतून मागणी होत आहे.
 

प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर अन्याय

 नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक बोधेगाव दुरक्षेत्र व इतर ठिकाणी जो पोलीस कर्मचारी जास्त कलेक्शन देईल त्याची महत्वाच्या ठिकाणी नेमणूक संबंधित अधिकारी करीत आहेत. त्यामध्ये पोलिसात गटबाजी निर्माण होऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे कर्मचाऱ्यातून बोलले जात आहे. 
 

बोधेगांव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे?

बोधेगाव येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्मितीचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून मंत्रालयात प्रलंबितआहे मात्र गृहखात्याकडून त्यास हिरवा कंदील कधी मिळणार असा यक्ष प्रश्न सातत्याने भेडसावत आहे.
 

फोन असून अडचण!

 शेवगाव पोलीस ठाण्यात असलेला फोन किरकोळ तांत्रिक नादुरुस्तीमुळे कधी कधी लागत नाही कोणाला संपर्क करावा हे कळत नाही. त्यामुळे जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 

उपअधीक्षक कार्यालयातील वसंत तालुक्यात बहरला---!


शेवगाव पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक असलेल्या वसंतचा तालुक्यात गावागावात विविध प्रकाराचा प्रताप मोठ्या प्रमाणात बहरला गेला असून संबंधित अधिकाऱ्यांना त्याची कल्पना असूनही अर्थपूर्ण संबंधामुळे दुर्लक्षित केले जात आहे. शेवगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या अनेक पोलिसांची वाळू व्यवसायात भागीदारी बरोबर गुन्हेगारांशी लागेबांधे संबंध आहे. त्याची पोलीस दलासह तालुक्यात उलटसुलट चर्चा झडत आहेत. खातेनिहाय चौकशी होणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...