नियमाचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर तहसीलदारांची कारवाई, एसटी बस चेक करण्याची जिल्ह्यात पहिलीच घटना - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १० एप्रिल, २०२१

नियमाचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर तहसीलदारांची कारवाई, एसटी बस चेक करण्याची जिल्ह्यात पहिलीच घटना

एसटी बस चेक करण्याची जिल्ह्यात पहिलीच घटना, बसमधील प्रवाशांनी कोरोना नियम बसवले धाब्यावर


सुपा - प्रतिनिधी


पारनेर तालुक्यामध्ये कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे नागरिकांकडून पालन केले जाते का? यासंदर्भात तहसीलदार ज्योती देवरे यांनी तालुक्यातील गावांना भेटी देत नियमावलीची अंमलबजावणी होत नसेल तेथे जात कारवाई केली आहे. सुपा येथे विविध ठिकाणी पाहणी करत नियम मोडणाऱ्या व्यवसायिक व दुकानदार यांच्यावर कारवाई केली असून नगर पुणे हायवे वर जाणाऱ्या  प्रवासी वाहतूक बसची पाहणी केली. त्यातील  15 ते 20 प्रवाशांवर मास्क न लावल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे.

 

parner tahsildar

एसटी गाड्यांतून प्रवासी वाहतूक मोठ्या संख्येने सुरू झाली आहे. या प्रवासात करोना रोखण्यासाठी तयार करण्यात आलेले नियम धाब्यावर बसविण्यात येत आहेत. यामुळे शहरात वाढत असलेला संसर्ग आता गाव-खेड्यात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.


विनामास्क प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त प्रमाणात आहे.  बसमधील अनेक प्रवासी मास्कचे साधे नियमही  पाळत नाहीत. एसटीच्या गाड्यांतून प्रवास करताना कोणत्याही प्रवाशांची चाचणी होत नाही. त्यामुळे प्रवासातच करोनाची बाधा होण्याचा धोका आहे. प्रवासात सुरक्षित अंतर ठेवण्याच्या नियमाचेही पालन होत नाही. यामुळे कोरोना नियमांना पायदळी तुडवून हजारोंच्या संख्येने वाहतूक सुरू आहे. यासाठी तहसीलदार ज्योती देवरे यांनी सुपा चौकामध्ये नगर , पुणे या शहरातून येणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस थांबून  नियमाचे पालन न करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे.


Tahsildar
एसटी बसमध्ये प्रवासी कोरोना नियम पाळतात का? याची पाहणी करतांना पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे


ज्योती देवरे यांनी बस मध्ये जाऊन प्रवाशांनी मास्क घातले आहेत की नाही? याची चाचपणी केली. बस मध्ये जेवढे प्रवासी बसून असतील तेवढ्यांना प्रवास करण्यासाठी परवानगी आहे. उभे राहून प्रवास करणारे नागरिक बस मध्ये असल्यास अशा बसवर देखील कारवाई करण्याचे आदेश आहेत. त्यासंदर्भात त्यांनी पाहणी केली आहे.


प्रवाशांनी बसमध्ये बसताना कोरोनासंदर्भातील नियमाचे पालन करावे. बस मध्ये कोणीही विना मास्क आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रवासी बसमध्ये उभे राहून प्रवास करण्यास मनाई आहे.
ज्योती देवरे
तहसिलदार पारनेर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...