कोरोनावर ठोस उपाययोजना करण्यास आरोग्य प्रशासन अपयशी, जनतेचे आरोग्य रामभरोसे
बाळासाहेब जाधव
शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा
शेवगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना तालुक्यातील आरोग्य विभाग लसीकरणात तर पोलीस प्रशासन हप्तेखोरी प्रकारणात व दंड वसूलीत दंग असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील भावीनिमगांव, शहरटाकळी, देवटाकळी, हिंगणगांव, ठाकूर निमगाव, आव्हाने सह अनेक गावात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आरोग्य विभाग लसीकरण करण्यात मग्न असल्याने गावाचे गावे रामभरोसे आहे.
ना कुठली तपासणी, ना कुठली आरोग्य यंत्रणा, ना कुठली जनजागृती त्यामुळे अनेक रुग्ण भितीपोटी दगावले आहेत. पोलीस प्रशासन तर हप्तेखोरी प्रकरणामुळे चांगलच अडचणीत आले आहे. एक - दोन तास नाकेबंदी करून डबल सिट, मास्क न वापरणे, मोकाट फिरणाऱ्या वर दंडात्मक कारवाई करुन वसूली करण्यात दंग आहेत. गावागावात अनेक रुग्ण कोरोनाची कुठलीही तपासणी न करता फॅमिली डॉक्टर कडून गोळ्या, औषधे घेवून होम काॅरनटाईन होवून उपचार घेत आहे. अशा कुटुंबाची शासकीय दप्तरी कुठेही नोंद होताना दिसत नाही.
या सर्व नोंदी शासकीय दप्तरी आल्यास तालुक्यात सर्वात मोठी संख्या उघड होईल. सर्वच आरोग्य, पोलीस, पंचायत समिती, ग्रामपंचायत ने कागदी घोडे न नाचवता प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीच्या घरोघरी जावून तपासणी करणे गरजेचे आहे. कोरोना बाधीत नागरीकांना होम काॅरनटाईन न ठेवता, तातडीने शासकीय रुग्णालयात हलवून त्यांच्या वर उपचार केल्यास कोरोना आटोक्यात आणण्यास मदत होईल. अन्यथा मृत्यूची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
पंचायत समितीने माझे गाव, माझी जबाबदारी उपक्रम राबवावा
पंचायत
समितीचे गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक ग्रामपंचायत पदाधिकारी व
ग्रामसुरक्षा दलाच्या पदाधिकारी यांच्या मार्फत माझे गाव, माझी जबाबदारी
उपक्रम राबवावा. यासाठी आरोग्य विभागाने सहकार्य करणे महत्त्वाचे आहे.
ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी
जावून कोरोनाची रॅपिड किंवा आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात. या तपासणी
मध्ये कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यास त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल
करावे. संशयित रुग्ण आढळल्यास ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसुरक्षा
दलाच्या पदाधिकारी यांनी विलंगिकरण कक्षात दाखल करण्यात यावे. विलंगिकरण
कक्षासाठी गावा गावातील शाळा ताब्यात घेण्यात याव्यात. माझे गाव, माझी
जबाबदारी ग्रामपंचायतीमार्फत उपक्रम राबविल्यास त्याचा कोरोनाला
थांबविण्यासाठी निश्चित फायदा होईल.
पोलिसांनी गावागावातील गर्दी हटवावी
शेवगाव
पोलीस प्रशासनाने होम गार्ड, दक्ष पोलीस मित्र, ग्रामसुरक्षा दलाचे
पदाधिकारी, पोलीस पाटील यांची मदत घेवून गावागावात, चौकाचौकात होणारी गर्दी
हटविण्यात यावी. प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा समित्या नेमवून बीटनुसार
फिरते पथक नेमल्यास गर्दी हटविण्यास मदत होईल. तालुक्याच्या ठिकाणी येणारी
संख्या आपोआप रोडावली जाईल. पोलीस प्रशासनाने हप्तेखोरी प्रकारणाकडे लक्ष न
देता कोरोना बाबत जनजागृती व गावागावात गर्दी हटाव मोहीमेकडे लक्ष
केंद्रित करावे.
आरोग्य विभागाने तपासणी किट उपलब्ध करून द्यावे.
तालुका
आरोग्य विभागाने प्रत्येक गावात आरोग्य कर्मचाऱ्यांना जबाबदारी दिलेली
आहे. त्या कर्मचाऱ्यांमार्फत आशा व अंगणवाडी सेविकेची मदत घेऊन घरोघरी
कोरोनाची रॅपिड किंवा आरटीपीसीआर चाचण्या होणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य
विभागाने गावागावात तपासणी किट उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जोर धरत
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...