खासदार साहेब, मतदारसंघाकडे लक्ष द्या - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शुक्रवार, ७ मे, २०२१

खासदार साहेब, मतदारसंघाकडे लक्ष द्या

बाहेरचा उमेदवार असताना तुम्हाला मतदारांनी स्विकारल
 

बाळासाहेब जाधव 

अहमदनगर / जलभूमी वृत्तसेवा 

 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे सदस्य डॉ. सुजय विखे शिर्डी मतदारसंघातील असतानाही दक्षिण च्या मतदारांनी तुम्हाला मोठ्या मनाने स्विकारले. सध्या मतदारसंघात कोरोनाने थैमान घातलेले असताना डॉ. विखे यांचे मतदारसंघाकडे दूर्लक्ष असल्याने मतदारांना खासदार साहेब, मतदारसंघाकडे लक्ष द्या. अशी म्हणण्याची वेळ आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आलेले दिलीप गांधी यांचे तिकीट भाजपने कापून डॉ. सुजय विखे यांना भाजपाने उमेदवारी दिली. 

 

 

 

बाहेरचा उमेदवार दिला असल्याने मतदारसंघात उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. बाळासाहेब विखे यांचा नेहमीच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क होता. बाळासाहेब विखे यांचे नातू म्हणून मतदारसंघात सहानुभूती मिळाली.निवडणूक जाहीर होण्याअगोदरच डॉ. सुजय विखे यांनी दोन वर्षे अगोदरच मतदारसंघ पिंजून काढला होता. मतदारसंघात जनसंपर्क दौरा करत असताना डॉ. विखे यांनी कोणत्याही पक्षाकडून होवो. अगर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. काँग्रेस, राष्ट्रवादी ची आघाडी असल्याने त्यातच दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी च्या वाट्याला आल्याने डॉ. विखे यांची पंचायत झाली. 

 

राष्ट्रवादी ने या मतदारसंघावर हक्क सांगून कुठलाही बदल होणार नसल्याचे राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी छातीठोकपणे सांगून टाकले. विखे - पवार यांचे राजकीय पूर्ववैमनस्य असल्याची मतदारसंघात चर्चा झडू लागल्याने राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळणार नसल्याची खात्री पटल्यानंतर डॉ. विखे यांनी भाजटपाची जवळीक साधून भाजपाकडून उमेदवारी खेचून आणली. उमेदवारी जाहीर होताच मतदारसंघात उलट सुलट चर्चेला उधाण आले. डॉ. सुजय विखे यांना पक्षाने उमेदवारी देतांना जिल्ह्याची दोन्ही मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. डॉ. सुजय विखे यांनी प्रचारादरम्यान विकास कामाची खैरात वाटण्यात आली. 

 

अनेक कामाचे आश्वासने देण्यात आली. बाहेरचा उमेदवार असताना मतदारांनी स्विकारत मोठ्या मतांनी निवडणूक दिले. मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट उभे राहिले. या संकटाच्या काळात लोकप्रतिनिधींचा आश्रय मिळेल.अशी अपेक्षा मतदारांना लागली होती. पण खासदार साहेब साध मतदारसंघात फिरत सुध्दा नाही. फेब्रुवारी मध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. गावागावात रुग्ण संख्या वाढत राहिली. अनेकांचे जीव गमवावे लागले. कोणताच पुढारी (सत्ताधारी किंवा विरोधक ) कोणीच लक्ष देत नसल्याची बाब दैनिक जलभूमीच्या लक्षात येताच सम्राटांनो, कोविड सेंटर सुरू करा, अशी तोफ वृत्तपत्रातून धडकावली. साखर सम्राटांबरोबर शिक्षणक्षेत्रातील पुढारी सरसावले. 

 

शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव येथे कोविड सेंटर सुरू झाले. शेवगाव - पाथर्डी मतदारसंघात सुरुवात प्रताप ढाकणे यांनी केली. त्यापाठोपाठ घुले बंधू, हर्षदाताई काकडे, आमदार मोनिका राजळे यांनी कोविड सेंटर सुरू केले. खासदार डॉ. सुजय विखे साखर सम्राट, शिक्षण सम्राट असताना ही मतदारसंघात स्वतंत्र कोविड सेंटर सुरु केले नाही. मतदारसंघात पूर्ण दूर्लक्ष असल्याचे दिसून येते. विखे पिता पुत्र राज्य सरकारवर टिका करत आहे. त्यांचे संपूर्ण लक्ष स्वतः च्या हक्काच्या मतदारसंघात दिसून येत आहे. त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदारांना खासदार साहेब, मतदारसंघाकडे लक्ष द्या.अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

 


बाळासाहेब विखे नावाने मोफत कोविड सेंटर सुरु करा
 

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाने बाळासाहेब विखे पाटलावर नेहमी प्रेम केले. या मतदारसंघाने एक वेळेस बाळासाहेब विखे यांना अपक्ष निवडणूक दिले. गेल्या निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांना निवडणूक देवून विखे पाटलांवरच प्रेम दाखवून दिले. त्यामुळे डॉ. सुजय विखे यांनी दक्षिण मतदार संघात मध्यवर्ती ठिकाणी ( नगर शहरात नव्हे.) बाळासाहेब विखे यांच्या नावाने मोफत कोविड सेंटर सुरु करुन मतदारांना दिलासा द्यावा. अशी मागणी जनतेतून होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...