पिकांना लागेल तसाच पाऊस पडेल? - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, १ मे, २०२१

पिकांना लागेल तसाच पाऊस पडेल?

दि. 30, 31 मे ला अवकाळी पाऊस?
 
परभणी / जलभूमी वृत्तसेवा 
 

या वर्षी पाऊस असा राहील खाली दिलेल्या तारखेप्रमाणे श्री . पंजाब डख ( हवामान अभ्यासक ) गुगळी धामणगाव ता . सेलु जि . परभणी यांचा हा अंदाज आहे. वारे बदल झाला कि दिशा , ठिकाण बदलते वाऱ्याच्या प्रवाहानुसार तारखेमध्ये एक दोन दिवसांचा बदल होतो . यावर्षी पिकांना लागेल तसाच पाऊस पडेल. पण ऑगस्ट चा शेवटचा आठवडा ते सप्टेंबर महिना पूर्ण पाऊस जास्त राहील . 

 

 

ज्या भागात पाऊस कमी पडला त्याची सरासरी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्याचा पडणाऱ्या पाऊसात भरुन निघेल . १) हा अंदाज खासकरून महाराष्ट्रतील कोरोडवाहू शेतकऱ्यांसाठी तयार केलेला आहे . २) ३०, ३१ मे व १ जून आवकाळी पाऊस पडेल . ३) दि . १४, १५, १६, १७, १८ जून या तारखेत पाऊस पडेल आणि काही भागातील पेरणी या पावसावर होईल . ४) दि . २८, २९, ३० जून रोजी या तारखेत पाऊस असेल . ५) दि . १३, १४, १५, १६ जुलै या तारखेत पाऊस असेल . ६) दि . २८, २९, ३०, ३१ जुलै खूप मोठा पाऊस राहील . ७) दि . १२, १३, १४, १५ ऑगस्ट या तारखेत पाऊस असेल . ८) दि . २६, २७, २८, २९ ऑगस्ट या तारखेत जोरदार पाऊस पडेल . ९) दि . ५, ६, ७ सप्टेंबर या तारखेत पाऊस राहील . १०) दि . १०, ११, १२, १३ सप्टेंबर या तारखेत पाऊस राहील . ११) दि . २४, २५, २६, २७ सप्टेंबर या तारखेत पाऊस राहील . १२) दि . १०, ११, १२, १३ ऑक्टोबर या तारखेत पाऊस राहील . १४) दि . २४, २५, २६, २७ ऑक्टोबर पूर्वविदर्भ व मराठवाडा पाऊस पडेल . १४) दि . ३ नोहेंबर राज्यात थंडीला सुरवात होईल . १५) दि. ८, ९, १० नोहेंबर तुरळक भागात पाऊस पडेल. 

 

पंजाब डख ( हवामान अभ्यासक ) 

गुगळी धामणगाव ता . सेलु 

जि . परभणी ( मराठवाडा )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...