प्रहार जनशक्ती पक्षाचे ताली-थाली बजाव आंदोलन - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, २० मे, २०२१

प्रहार जनशक्ती पक्षाचे ताली-थाली बजाव आंदोलन

भातकुडगांव, हिंगणगांव, खानापूर, गदेवाडीत आंदोलनाला प्रतिसाद
 

बाळासाहेब जाधव 

अहमदनगर / जलभूमी वृत्तसेवा 

 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुर, मूग, उडीद या कडधान्यांची आयात थांबवावी व रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करावे. या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी ( दि. २० मे ) सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान राज्यभर ताली-थाली बजाव आंदोलनचा इशारा प्रहारच्या वतीने देण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरासमोर, गच्छीवर कोरोणा नियमाचे पालन करून ताली-थाली बजाव आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी केले होते. 

 

 

जिल्ह्यात अनेक ठिकाणी ताली-थाली बजाव आंदोलन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्षाचे शेवगाव तालुकाध्यक्ष संदिपराव बामदळे व कल्पेश दळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात भातकुडगांव, हिंगणगांव, खानापूर, गदेवाडीसह अनेक ठिकाणी ताली-थाली बजाव आंदोलन करण्यात आले. प्रहार जनशक्ती पक्ष हिंगणगाव ने शाखेच्या वतीने आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशावरून व शेवगाव तालुका अध्यक्ष संदीपराव बामदळे यांच्या आदेशानुसार हिंगणगांव येथे आंदोलन करण्यात आले. 

 

यावेळी शाखा अध्यक्ष कानिफनाथ धुमाळ, संजय पवार, नकुल ढवळे, सतिष ( बाप्पु) पवार, बाबासाहेब गरड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवगाव तालुक्यातील खानापूर शाखेच्यावतीने ताली, थाळी बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका युवक अध्यक्ष कल्पेश दळे, रामदास लिंबोरे व उमेश्वर मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. गदेवाडी ( ता. शेवगाव ) येथे प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने तालुका अध्यक्ष संजय नाचण, बाळासाहेब मडके, सोमनाथ बोडके, गोरख गालफाडे, अर्जुन मडके यांनी ताली-थाली वाजून आंदोलन केले. 

 

भातकुडगाव फाटा येथे तालुकाध्यक्ष संदीपराव बामदळे, हरिचंद्र जाधव, अविराज जाधव, तोफिक तांबोळी आंंदोलनात सहभागी झाले. शेवगाव येथे तहसील कार्यालयासमोर तालुका अध्यक्ष संदीपराव बामदळे, शहराध्यक्ष अशोकराव कुसळकर, राजूभाऊ लांडे तर क-हे टाकळी येथे विकास गटकळ, बाळू वीर, देवटाकळी येथे अनिल मेरड, सचिन मेरड यांच्या सह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...