अध्यक्ष शांताराम उदागे ( दिल्ली ) यांची दानशूर प्रवृत्ती, परिसरातून कौतुक
पाथर्डी / जलभूमी वृत्तसेवा
महाराष्ट्र
मंडळ गुरु ग्रामचे अध्यक्ष शांताराम उदागे ( दिल्ली ) यांनी भाळवणी येथील
शरदचंद्रजी पवार आरोग्य कोविड सेंटरसाठी एक हजार लिटर पाणी ( बिसलरी १००
बाॅक्स ) पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्याकडे सुपूर्द करण्यात
आले.
आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे कोविड
सेंटर सुरू केल्यानंतर मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत
अनेकांनी पुढाकार घेत मदतीचा ओघ चालू झाला. तालुक्यासह राज्यातून,
परराज्यातून मदत येत आहे. काही दानशूर व्यक्ती धनादेश, रोख स्वरुपात तर
काही ज्वारी, गहू, तांदूळ,फळे, पाणी बाॅक्स, औषधे व इतर स्वरूपात मोठ्या
प्रमाणात मदत केली जात आहे.
यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा आपणही
समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील व
सध्या नोकरीनिमित्त दिल्ली येथे असणारे शांताराम उदागे यांनी स्वखर्चाने एक
हजार लिटर पाण्याचे बाॅक्स शरदचंद्रजी पवार आरोग्य कोविड सेंटरला पोहच
केले. यावेळी आदिनाथ बर्डे, संदिप उदागे, गणेश आमटे, सुसरे येथील मित्र मंडळी
उपस्थित होते.
अध्यक्ष शांताराम उदागे ( दिल्ली ) यांची दानशूर प्रवृत्ती
पहिल्या
कोरोनाच्या लाटेतही अचानक लाॅकडाऊन जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक
नागरिक अडकले होते. त्यावेळी ही महाराष्ट्र मंडळ गुरु ग्रामचे अध्यक्ष
शांताराम उदागे ( दिल्ली ) यांनी स्वखर्चाने वाहने लावून नागरिकांना
दिलासा दिला होता. त्यांच्या या दानशूर प्रवृत्तीचे परिसरातून कौतुक होत
आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...