विजेचे शॉटसर्केटने हॉटेल जळीत, साडेतीन लाख रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, २० मे, २०२१

विजेचे शॉटसर्केटने हॉटेल जळीत, साडेतीन लाख रुपये किंमतीचे साहित्य जळून खाक

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील हॉटेल पुजाचे मोठे नुकसान
 

शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा 

 

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावरील काळ्या ओढ्या जवळील असणाऱ्या हॉटेल पुजामध्ये सोमवारी दि.१७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विजेच्या झालेल्या शॉट सर्केटमुळे हॉटेल पूजा परमिट रूम मधील सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचे साहित्य आगीत जळून खाक झाल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी हॉटेलमधील कर्मचारी हे हॉटेल समोरच असणाऱ्या झाडाला पाणी देत असताना त्यांना हॉटेलमधून जळाल्याचा वास आल्याने उघडकीस आला आहे. 

 

 

सदरील घटनेबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी हॉटेल व्यवसायिक सुनील नामदेव गर्जे यांचे बोधेगाव जवळच शेवगाव-गेवराई महामार्गावर पुजा परमिट रूम या नावाने हॉटेल असून लॉकडाऊन असल्याने हॉटेल बंद होते. या हॉटेलमध्ये सोमवारी दि. १७ रोजी मध्यरात्री विजेच्या झालेल्या शॉट सर्केट मुळे आग लागल्याने हॉटेल मधील फ्रीज, गॅस शेगडी, किराणा माल, भांडी, प्लास्टिकच्या खुर्च्या, टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे, मिक्सर, वायरिंग, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्वयंपाक गृहामधील इतर साहित्यासह सुमारे साडेतीन लाख रुपये किंमतीचे साहित्य लागलेल्या आगीत जळून खाक झाले असल्याची माहिती बोधेगाव येथील हॉटेल व्यवसायिक सुनील नामदेव गर्जे यांनी आमच्या दैनिक जलभूमीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. सदरील जळीत झालेल्या घटनेची खबर ही शेवगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...