अक्षयतृतीया च्या मुहूर्तावर कोविड सेंटर सुरु होणार - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, १३ मे, २०२१

अक्षयतृतीया च्या मुहूर्तावर कोविड सेंटर सुरु होणार

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात ऑक्सीजन बेड सह कोविड सेंटर
 
बोरी फाटा / जलभूमी वृत्तसेवा

राहुरी तालुक्यातील पूर्व भागात वळण गावामध्ये ऑक्सीजन बेड सह सुसज्ज कोविड केअर सेंटर दि. 14 रोजी अक्षयतृतीया, रमजान ईदच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येत असल्याने तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे.
 

वळण परिसरातील रुग्णसेवेसाठी अद्यावत सर्व सोयी सुविधायुक्त विलगीकरण कक्षासह मॅक्स केअर कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहे. सुरुवातीला दहा ऑक्सिजन, पाच बेड, उर्वरित 25 जनरल बेड असे एकूण चाळीस बेड व्यवस्था माफक दरात करण्यात येणार आहे. या ठिकाणी 24 तास तज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित नर्स तसेच इतर तज्ञ डॉक्टर यांच्या भेटी असणार आहे. बिल देखील शासकीय नियमानुसार आकारणी करण्यात येईल. 
 
आता पूर्व भागातील कोरोना पेशंटला शहरात जाऊन बेड शोधण्यासाठी धावपळ करण्याची वेळ येणार नाही. राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील 32 गावाला वाली कोणी नसल्याने डॉ. विजय मकासारे यांच्या रूपाने देवच भेटला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...