नेवासा / जलभूमी वृत्तसेवा
जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त कृतज्ञता पोस्टरद्वारे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याला चिमुकल्या मुलांकडून सलामी देण्यात आली. नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने शिक्षिका शीतल झरेकर-आठरे यांनी हा उपक्रम राबवला.
कोरोनाच्या संकटात आज जगभर डॉक्टर व सर्व आरोग्य कर्मचारी हे देवदूत बनून अहोरात्र सेवा देण्याचे कार्य करत आहे. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानून सर्व आरोग्य यंत्रणा जीव धोक्यात घालून झटत आहे. त्यांचे मनोधैर्य वाढवावे. डॉक्टर व नर्सेस सह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. म्हणून पोस्टरवर चित्राद्वारे त्यांच्या बद्दल विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त करत ऑनलाइन पद्धतीने जागतिक रेड क्रॉस दिन साजरा केला.
सदर पोस्टर कृतज्ञता मध्ये विद्यार्थ्यांनी "डॉक्टरांचा आम्हाला अभिमान...कोरोना योध्ये म्हणून त्यांचा करूया सन्मान" तसेच "डॉक्टर आहे देशाची शान.. त्यांचाबद्दल आहे आम्हाला अभिमान" अशी घोषवाक्ये तयार करून विद्यार्थ्यांनी डॉक्टर नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याला मानवंदना दिली.लॉकडाऊनच्या काळात आदर्श शिक्षिका शीतल झरेकर-आठरे यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...