मराठा महासंघ व मराठा क्रांती मोर्चाची 'झूम बैठक' - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

रविवार, ९ मे, २०२१

मराठा महासंघ व मराठा क्रांती मोर्चाची 'झूम बैठक'

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भात चर्चा
 

चांदा / जलभूमी वृत्तसेवा 

 

शेतकरी मराठा महासंघाचे राज्याध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय मराठा महासंघाचे नगर उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गवांदे व दक्षिण जिल्हाध्यक्ष बिभीषण पाटील खोसे यांच्या उपस्थितीत झूम बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वानुमते सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते यांनी एकत्र येऊन बाजू मांडावी, पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी असे ठरले. 

 

 

कोरोनाची संकट लक्षात घेता १६ मे नंतर मोठ्या स्वरूपात प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात आंदोलन करू असा इशारा संभाजी दहातोंडे यांनी दिला मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात मांडणी करताना आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास करून राज्यातील मराठा आमदार, खासदार यांना भेटून हा प्रश्न पुन्हा मार्गी लावला पाहिजे. अशा तीव्र भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या. 

 

गाव गाव आंदोलन झाली पाहिजे. सरकारला मराठा आरक्षणाचे गांभीर्य समजलं पाहिजे. अशीही भूमिका काही मराठा क्रांती मोर्चा चे पुणे जिल्ह्याचे समन्वयक मनोहर वाडीकर यांनी मांडली. मराठा आरक्षणासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करलं त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. अशी भूमिका त्यादृष्टीने पुन्हा मराठा आरक्षणाचा एल्गार सुरू करण्याची भूमिका नगर उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी मांडली. 

 

अनेक आलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचे अवलोकन करून त्या सूचना राज्य कमिटीकडे पाठवण्याचा ठराव करण्याची सूचना जिल्हा सचिव सुनीलकुमार चौधरी यांनी मांडली, जेष्ठ विधिज्ञ विनोद पाटील यांचाही पुढील बैठकीत सहभाग करून त्यांचंही या बाबत काय मत आहे ते विचारात घ्यावं. अशी सूचना वैभव ठाणगे यांनी मांडली. यात सहभागी भाऊसाहेब पाटील वाकचौरे ,शामराव पवार, दिलीप पाटील थोरात , अनिकेत कराळे, विकास नरवडे, गंगाधर बोरुडे, ज्ञानेश्वर फसले, नानाभाऊ डोंगरे, अशोक आवारी, सुनील निमसे, किशोर धुमाळ यांनी सहभाग नोंदवून आपली मते व्यक्त केली . सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी केले व आभार जिल्हा सचिव सुनील कुमार चौधरी यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...