शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा
असेल त्याच्या सह आणि नसेल त्याच्या शिवाय आपलं जीवन आनंदाने जगणारे लोककलावंत गेल्या एक ते दिड वर्षा पासुन कला हेच जिवन असताना लाॅकडाऊनमुळे अत्यंत भयानक परिस्थिती तुन जात आहे. एक म्हणजे बेरोजगारी आणि यातच पोटातील भुख, औषध उपचार न मिळाल्याने अनेक लोक कलावंतांनी जगाचा निरोप घेतला. सहानुभूती नको तर प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा आहे. ज्यांनी महाराष्ट्राची संस्कृती आणी संस्कार जिवंत ठेवण्याचे काम केले. आज तोच उपासमारीची शिकार होतोय हे पाहुन मन अस्वस्थ झालंय.
नगर जिल्ह्यातील सत्ताधारी, विरोधक यांना विनंती आहे. राजकारण तुम्ही करा पण आजची वेळ ती नाही. मी लोकप्रतिनिधींना अनेक वेळा या माध्यमातून संपर्क केला. कलावंताच्या व्यथा सांगितल्या पण सकारात्मक उत्तर मिळाले नाही. याची मनाला खंत आहे. वेगवेगळया जिल्ह्यातील मंडळी तेथील स्थानिक कलाकार यांना मदत करत आहेत. पण तसे आपल्याकडे होत नाही. याचं शल्य आहे. सन्मान नेहमी होतो पण आजच्या स्थितीत मानधनाची गरज आहे. पुरस्काराने प्रेरणा मिळते पण जगण्यासाठी पोटाची काळजी घ्यावी लागते. उपाशी पोटाने क्रांती करण्याचे दिवस आता संपले असल्याची खंत ह. भ. प. समाजप्रबोधनकार कल्याण म. काळे पाटील यांनी व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...