कोरोना उपचारासाठी गोरगरीब जनता (शेतकरी) सावकारच्या उंबरठ्यावर? ग्रामीण भागात सावकारकी तेजीत - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, १९ मे, २०२१

कोरोना उपचारासाठी गोरगरीब जनता (शेतकरी) सावकारच्या उंबरठ्यावर? ग्रामीण भागात सावकारकी तेजीत

शेतीतून मिळालेल्या उत्पादनात कसा होणार कोरोना रुग्णांचा खर्च
 

दिपक खोसे 

ढोरजळगांव / जलभूमी वृत्तसेवा 

 

कोरोना महामारीत जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. एक तर लॉकडाऊनमुळं शेतकऱ्यांचा भाजीपाल्यासारखा माल शेतात सडत आहे. पहिल्या पावसामुळं झालेली नुकसान भरपाई मिळालेली नसतानाच दुसऱ्या झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे. अशा परिस्थितीत घरात कोणी कोरोनाने आजारी पडलं तर सरकारी दवाखाने कोरोना रुग्णांनी भरुन गेले आहेत. 

 


खाजगी दवाखान्यात जायचं म्हटलं तर लाखो रुपये खर्च लागतो शेतक-याने लोखंडे रुपये आणायचे कुठून? हा प्रश्न सतावतो. शेतकरी कुटुंबातील एक सदस्य जरी कोरोना बाधित झाला तर कोरोना चा उपचार न परवडणारा आहे. त्यात जर खाजगी रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली तर शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, उपचारासाठी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेण्याची वेळ शेतकरी कुटुंबावर आली आहे. अगोदरच कर्जाच्या खाईत असलेला शेतकरी पुन्हा नव्या कर्जाच्या विळख्यात सापडत आहे. 

 

राज्यातील ग्रामीण भागातील गावोगावी मोठया प्रमाणात कोरोना चा फैलाव झाला आहे. अनेक शेतकरी कुटुंबातील सदस्यांना कोरोना लागण झाली आहे. घराचा आधारस्तंभ असलेले हजारो शेतकरी कोरोना मूळ मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक शेतकरी कुटूंब उघड्यावर आल आहे. घरात एका व्यक्तीला कोरोना झाला तर इतर व्यक्तीला देखील होतो. या कुटुंबाला कोरोनापासून वाचवण्यासाठी लाखोंचा खर्च करावा लागत आहे. बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यांना खाजगी सावकाराकडून चढ्या व्याज दराने नाईलाजस्तव कर्ज काढावे लागत असल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत चालला आहे. 

 

शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊन मुळे गेल्या दोन वर्षाच्या हंगामात पाहिजे तस उत्पादन झालेल नाही. त्यातच गेल्या हंगामात बोगस बियाणे, नैसर्गिक आपत्तीत एकदा नव्हे तर दोन ते तीन वेळा शेतकऱ्यांना सामना करावा लागला आहे. वाया गेलेले पिकांचे पंचनामे तर झाले मात्र सरकार कडून भरपाई मिळाली नाही. अशी परिस्थिती राज्यातील शेतकऱ्यांची आहे. हातात पैसा नाही अगोदरच पीक कर्जासाठी सरकारी तसंच खाजगी बँकांकडून कर्ज डोक्यावर आणखीन कोरोना महामारीच भूत मानगुटीवर आहे. 

 

सगळ्यात दुर्दैव म्हणजे शेतात राहणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांच सगळ पिक कोरोनाच्या विळख्यात अडकल. जास्तीत जास्त कुटूंब कोरोना बाधित झाले आहेत. काहींना सरकारी दवाखान्यात जागा मिळाल्या. मात्र जास्तीत जास्त लोक भरडले गेले ते खाजगी दवाखान्यात. एकेका घरात तीन चार रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी पुन्हा सावकारांच्या दाराशी जावून शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं लागले. दिवाळीला हंगाम आल्यावर परत करण्याच्या बोलीवर शेतकऱ्यांनी हे कर्ज घेतली आहेत.

 


सावकरकी तेजीत
 
ग्रामीण भागातील काही सावकार हातावर रक्कम देत नाही. शेतकऱ्यांना स्वतः ची शेती स्व खर्चातून खरेदी करून द्यावी लागते. ठरलेला व्यवहार पूर्ण झाल्यानंतर परत स्व खर्चाने जमीन स्वतःच्या नावावर करुन घ्यावी लागत आहे. कोरोना मुळे गोरगरीब जनतेसह शेतकरी अडचणी असल्याचे ओळखून खाजगी सावकारने व्याज दर वाढवला असल्याचे बोलले जाते. सध्या ग्रामीण भागात सावकारकी धंदा तेजीत असल्याचे समजते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...