दिपक जोशी
लिंबेजळगाव / जलभूमी वृत्तसेवा
लिंबेजळगाव, तुर्काबाद खराडी (ता.गंगापूर) व परीसरातील गावात उन्हाळ्यात करण्यात येणार्या शेवया, पापड्याची लगबग जोरदार सुरु झाली आहे. सध्या सर्वच देशभरात कोरोना महामारी सुरु आहे. सर्वच नागरिक लॉकडाऊन सुरु असल्याने घरीच आहे. त्यात दरवर्षी करण्यात येणाऱ्या महीलांची शेवया, पावड्या, कुरडयाची धामधूम ग्रामीण भागात जोरदार सुरु आहे.
गावातील महिला एकमेकींना सहाय्य करतात, सकाळी लवकर उठुन सहाच्या आत स्वयंपाक, धुनी, भांंडी करुन शिक्षण जारी असलेल्या शेवया, कुरडया करण्यात येणाऱ्या साहित्य जमा करुन कुरडया सकाळी होतात. तर लिंबाच्या झाडाखाली बाज, पलंग याला सोऱ्या बांधुन सकाळी ११ नंतर ४ वाजेपर्यंत विविध गाणे गात शेवया तयार करण्यात महीला दंग असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...