लॉकडाऊनमध्ये कामधंदा नाही, शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक नैराश्यातून एका युवकाची आत्महत्या - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शुक्रवार, २८ मे, २०२१

लॉकडाऊनमध्ये कामधंदा नाही, शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आर्थिक नैराश्यातून एका युवकाची आत्महत्या

युवकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
 

माळवाडगांव/ जलभूमी वृत्तसेवा 

 

खानापूर येथील युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवार रोजी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. दत्तात्रय बाळासाहेब आदिक (वय ४० रा. खानापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने जेवण करून घरातील सर्वजण बाहेर झाडाखाली बसलेले असल्याने घरात कोणीच नसल्याने दत्तात्रय याने घरातील अँगलला दोरीच्या गळफास घेऊन आत्महत्या केली. 

 

 

सदर घटना लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने दत्तात्रय याला बेशुद्ध अवस्थेत खाली उतरविले. बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. पोलीस पाटील संजय आदिक यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास म.पो.हेडकॉन्स्टेबल गायकवाड हे करत आहेत.

 

काल रात्री शोकाकुल वातावरणात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शासनाचे नियम पाळून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान दत्तात्रय आदिक हा अतिशय कष्टकरी तरुण होता. सध्या लॉकडाऊन असल्याने कामधंदा तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने त्याने आर्थिक नैराश्यातून ही आत्महत्या केली असून असे परिसरातील काही नागरिकांनी सांगितले. कारण सर्वसामान्य कुटुंब असल्याने व सध्या कामधंदा नसल्याने गरीबांचे जगणे मुश्कील झाले आहे, असे सांगण्यात आले. मयताच्या मागे पत्नी, भाऊ,तीन मुली,आई वडील असा मोठा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...