महाराष्ट्राच्या ग्रामविकासात सरपंच परिषदेचे मोठे योगदान - पद्मश्री पोपटराव पवार - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शुक्रवार, २८ मे, २०२१

महाराष्ट्राच्या ग्रामविकासात सरपंच परिषदेचे मोठे योगदान - पद्मश्री पोपटराव पवार

सरपंच परिषदेचे सदस्य नोंदणी मोबाईल ॲपचे लोकार्पण
 

पारनेर / जलभूमी वृत्तसेवा 

 

सरपंच परिषदेने राज्यभर सरपंचांच्या हक्क अधिकार न्याय-अन्यायावर अविरतपणे काम करणाऱ्या सरपंच परिषदेचे सदस्य नोंदणी मोबाईल ॲपचे लोकार्पण पद्मश्री पोपटराव पवार यांचे शुभहस्ते आदर्श गाव हिवरे बाजार याठिकाणी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये ऑनलाईन झाले. 

 

 

यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सरपंच नेते दत्ताभाऊ काकडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते पाटील, प्रदेश महासचिव विकास जाधव, अहमदनगर जिल्हाध्यक्ष आबा पाटील सोनवणे, राजेंद्र दगडखैर, मुकुंद दुबे उपस्थित होते. यावेळी पोपटराव पवार यांनी सरपंच परिषदेचे महाराष्ट्रातील चालू असलेले काम उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासामध्ये भर घालण्यात सरपंच परिषदेचा मोठा वाटा आहे. भविष्यामध्ये हे काम जोमाने वाढवावे. 

 

राज्य व देशामध्ये सरपंच व शेतकरी जोपर्यंत संघटित होत नाही. तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही. आता सरपंचांनी संघटित व्हावे. सरपंच परिषदेची ताकत वाढवावी. सरपंच परिषदेच्या सक्रीय सभासदत्व घ्यावे. असे आवाहन केले. कोरोना निर्मूलनाच्या बाबतीत मार्गदर्शन केले. या मोबाईल ॲपच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आजी-माजी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची रीतसर नोंदणी केली जाणार आहे. 

 

पक्षविरहित सरपंच संघटन सरपंचाचे हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्रभर सरपंच परिषदेच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देत आहोत. असे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे म्हणाले. अनिल गीते पाटील बाबासाहेब सोनवणे यांनीही आपले मनोगत या लाईव्ह कार्यक्रमांमध्ये व्यक्त व्यक्त केले. सरपंच परिषदेचे महासचिव विकास जाधव यांनी प्रस्ताविक केले, सूत्रसंचालन व आभार उद्धव काळापहाड यांनी मानले.




सरपंच परिषदेच्या मोबाईल ॲपची पूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर पद्मश्री पोपटराव पवार यांनी सरपंच परिषदेच्या ॲप वर नोंदणी करून सरपंच परिषदेचे सभासदत्व राज्यातील सरपंचांनी स्वीकारावे असा संदेशच या निमित्ताने  दिला.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...