त्या तीन पोलीस मोह-यांचा बळी? पडद्याआडच्या गाॅडफादरवर कारवाई कधी? - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, ४ मे, २०२१

त्या तीन पोलीस मोह-यांचा बळी? पडद्याआडच्या गाॅडफादरवर कारवाई कधी?

त्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमणूकामागील रहस्य कायम. 
सूत्रधारावर कारवाई करा, जनतेची मागणी.
 

बाळासाहेब जाधव 

शेवगाव / जलभूमी वृत्तसेवा 

 

शेवगाव तालुक्यात वाळू हप्तेखोरी प्रकरण रोजच काहींना काही विषयावर चांगलेच गाजत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पोलीस उपअधिक्षक कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्या तीन कर्मचारी कोणत्या पदावर व कोणत्या विभागात नेमणूका आहेत. याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. साहेबांचा RTPC लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने, साहेबांच्या कार्यपद्धती बद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

 

 

या तीन कर्मचाऱ्यांची कलेक्टर म्हणून कोणी नेमणूक केली होती. सदर प्रकार घडत असताना याचा सुगावा साहेबांना का लागला नाही. सुगावा न सोडणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात तरबेज असलेले अधिकारी, त्यांच्या कार्यालयात सुरु असलेल्या हप्त्तेखोरीचा साधा मागमूस त्यांना लागला नाही, हे विशेष म्हणावे लागेल. पडद्याआड दडलेल्या अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्यांना बळीचे बकरे करुन हे प्रकरण दडपण्याचा हा प्रकार तर नाही अशी शंका उपस्थित होत आहे. 

 

त्या त्रिमूर्तीने कोणाच्या वरदहस्ताने आणि कोणाच्या सांगण्यावरुन हे उद्योग केले. त्या अधिका-यांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वसंत कान्हु फुलमाळी (रा. शंकरनगर, पाथर्डी), संदिप वसंत चव्हाण (रा. पोलीस वसाहत, शेवगाव), कैलास नारायण पवार (रा. शंकरनगर, पाथर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर ते तिघे पसार झाले आहे. या प्रकरणाबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी मौन बाळगले आहे. पुढच्या ला ठेस मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे पोलीस निरीक्षकाने तातडीने वसुली कर्मचारी बदलून काय सिध्द करणार? याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांत दबक्या आवाजात उलट सुलट चर्चा चालू आहे.

 


पोलीस उप अधीक्षक यांच्या गाडीचा चालक कोण ?

शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल आहे. चव्हाण, पवार, फुलमाळी या कर्मचाऱ्यांच्या नेमणूका इतर ठिकाणी असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. पोलीस उप अधीक्षक यांच्या गाडीचा अधिकृत चालक पाथर्डी येथील दुसरे शासकीय वाहन चालवत आहे. साहेबांच्या गाडीवर चालक कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.तीन ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमणूका कोणत्या ठिकाणी व कोणत्या पदावर आहेत हे पोलीस प्रशासनाने जाहीर करावे.
  
 

माझी नेमणूक ऑफिसला विचारा - अकोलकर

शेवगाव उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांच्या गाडीवर अधिकृत चालक म्हणून राजेंद्र अकोलकर यांची नेमणूक असल्याची चर्चा असल्याने अकोलकर यांच्या शी दैनिक जलभूमीच्या संपादकांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता अकोलकर म्हणाले की, माझी चालक म्हणून शेवगाव ला साहेबांच्या गाडीवर नेमणूक आहे.
ती गाडी चव्हाण नामक व्यक्ती चालवत असल्याची चर्चा आहे. त्यावर अकोलकर म्हणाले, याबाबत आँफीसला विचारा. एवढे सांगून पुढील बोलण्याचे टाळले असल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
  
 

एका कर्मचाऱ्यांची गैरहजेरी

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यावर चौकशीच्या फे-यात आपण गुंतवू नये ? यासाठी पोलीस अधिकारी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतांना दिसत आहे. आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने साहेबांनी त्या कर्मचाऱ्याची गैरहजेरी लावली असल्याची चर्चा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आहे. याबाबीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी जोर धरत आहे.
  
 

अजूनही हप्ते खोरी, अवैध धंदे चालूच

जिल्ह्यात शेवगाव ची हप्ते खोरी गाजत आहे. तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. या प्रकारणावर चौकशीच्या फे-या चालू आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तालुक्यावर बारीक लक्ष असताना तालुक्यात अजूनही अवैध धंदे चालूच आहेत. पोलीस निरीक्षकांनी वसुली कर्मचारी बदलले असले तरी अगोदर ज्यांनी हप्ते गोळा केले. ते सर्व लोकेशन देत असल्याने अवैध धंदे बिनबोभाट चालू आहेत. आम्ही हप्ते दिलेले असल्याने आमची वाहने पकडू शकत नाही ? अशी चर्चा अवैध धंदे करणा-यांमध्ये चालू आहे.
  
 

तीनही पोलीस कर्मचारी निलंबित

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेवगाव उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तीनही कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याचे समजते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...