हा तलाठी 'लाचलुचपत'च्या कारवाईत झाला जेलबंद - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, १० जून, २०२१

हा तलाठी 'लाचलुचपत'च्या कारवाईत झाला जेलबंद

फेरफार नोंद करण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी

किरण जगताप
कर्जत / जलभूमी वृत्तसेवा

कर्जत तालुक्यातील गुरवपिंप्री गावचा तलाठी चंद्रकांत गजाबा बनसोडे, वय ५६ वर्षे हा लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. शेतीचे वाटणी पत्र करुन त्याआधारे फेरफार नोंद करण्यासाठी त्याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती १२००० रुपयांची लाच स्वीकारताना मिरजगाव येथे त्याला जेलबंद करण्यात आले आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी, तक्रारदार यांनी त्यांचे चुलत भावाचे गुरवपिंप्री गावातील शेतीचे वाटणी पत्र करुन त्याआधारे फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी सजा गुरवपिंप्री यांच्याकडे अर्ज दिला होता. त्याआधारे फेरफार नोंद करण्यासाठी तलाठी व त्याचा मदतनीस (खाजगी इसम) यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार यांनी लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

लाचलुचपत विभागाच्या पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्र, नगर सोलापूर हायवे, मिरजगाव येथे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली.अमित सर्जेराव शिर्के, वय ४० वर्षाचा चांदा खुर्द येथील दोन नंबरचा आरोपी मात्र पथकाच्या हाती लागला नाही. 

सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर, सापळा पथक पोलीस निरीक्षक शाम पवरे, पोलीस रमेश चौधरी, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, चालक पोलीस हवालदार हरुन शेख, राहुल सपट यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नाशिक परिक्षेत्रातील लाच प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे, वाचक पोलीस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...