दैनिक जलभूमीला वाचकांचा उदंड प्रतिसाद, दोन महिन्यांत सहा लाख वाचक - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

गुरुवार, १० जून, २०२१

दैनिक जलभूमीला वाचकांचा उदंड प्रतिसाद, दोन महिन्यांत सहा लाख वाचक

वाचकांची क्राईम, राजकीय बातम्यांना पसंती, डिजिटल अंकास मागणी

शिवम् जाधव
शेवगांव । जलभूमी वृत्तसेवा 
 
जल भूमी नावाने प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर वाचकांच्या आग्रहखातर दि. ६ एप्रिल पासून पोर्टल तर दि. १४ एप्रिल पासून डिजिटल अंक सुरु केला.दोन महिन्यांत वाचकांना उदंड ( उत्स्फूर्त ) प्रतिसाद मिळाला.वाचकांनी क्राईम, राजकीय बातम्यांना पसंती दिल्याचे दिसून येते. डिजिटल अंकास मागणी होत असून ६ लाख१७ हजार ५०० वाचकांची नोंद झाली.

दैनिक डिजिटल अंकाचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. या अंकासही भरभरुन प्रतिसाद मिळाला. सकाळी लवकर डिजिटल अंक सोशल मिडीयावर आला नाहीतर लगेच वाचकांचे फोन, मेसेज यायला सुरुवात होतात.


पोर्टलवर दि.१० जून अखेर १८५ बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. यामध्ये अनुक्रमे १) सोनाराचा खुन,भातकुडगांव शिवारात मृत्यूदेह आढळला ( वाचक- १ लाख १३ हजार १९१ ), २) लोकप्रतिनिधी आणि सोशल मीडियातील चमकोगिरी ( वाचक- ४५ हजार ३३७ ), ३) उसाच्या शेतात स्त्री जातीचे अर्भक सापडल्याने खळबळ ( वाचक- ३५ हजार ६३९ ), ४) अहमदनगर जिल्हा हादरला, युवकाचा भर चौकात धारदार शस्त्राने वार करून हत्या ( वाचक- १२ हजार १३४ ), ५) शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपला ( वाचक- १२ हजार ११९ ) या पाच बातम्या वाचकांनी लोकप्रिय ठरविल्या आहेत.

त्यामुळे जलभूमी चे मार्गदर्शक शौखतभाई शेख, बाळासाहेब जाधव, संपादक शिवम जाधव, निवासी संपादक शंकर मरकड, दिपक खोसे व जलभूमी परिवारांंतर्फे वाचक, प्रतिनिधींना धन्यवाद देण्यात आले.

प्रतिनिधीसाठी इच्छूकांनी संपर्क साधा - जाधव
 
दैनिक जलभूमी अहमदनगर जिल्ह्यासह महाराष्ट्र लोकप्रिय ठरु पाहत आहे. या वृत्तपत्रासाठी अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका प्रतिनिधी व प्रत्येक जिल्हा परिषद गटात प्रतिनिधीची नेमणूक करवयाची आहे. इच्छूकांनी संपादक बाळासाहेब जाधव ( मो.९८३४९६७७६७ ), निवासी संपादक शंकरराव मरकड ( मो.९५२७०७७९३६ ) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन शिवम जाधव यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...