शिक्षकेत्तर संघाकडून राजाराम मोरे यांचा सन्मान - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

बुधवार, ९ जून, २०२१

शिक्षकेत्तर संघाकडून राजाराम मोरे यांचा सन्मान

जनता शिक्षण मंडळ दहिगांवने संस्थेचे मोरे सेवानिवृत्त

कुकाणा / जलभूमी वृत्तसेवा

शेवगाव तालुक्यातील दहिगांवने येथील जनता शिक्षण मंडळाचे नवजीवन माध्यमिक विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक राजाराम नाना मोरे यांच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. नेवासा तालुका शिक्षकेत्तर संघटनेच्या वतीने मोरे यांचा सन्मान करण्यात आला.


राजाराम मोरे नेवासा तालुक्यातील देवगाव येथील जयश्रीराम माध्यमिक विद्यालयात दि.१ डिसेंबर १९९८ रोजी कनिष्ठ लिपिक पदावर रुजू झाले. २५ ℅ अंशतः अनुदानावर सेवेला प्रारंभ करत शाळेच्या जडणघडणीत मोरे यांचा मोठा वाटा आहे. शाळेची अनुदान टप्पावाढ करण्यापासून ते शाळेच्या अनेक कामात हिरारीने भाग घेत असत. मार्च २००१ ला शाळेला १०० % अनुदान प्राप्त झाले. 

सेवानिवृत्त निमित्त जनता शिक्षण मंडळाने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र घुले पाटील यांनी राजाराम मोरे यांचा सन्मान करून केलेल्या कामकाजाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.


नेवासा तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने देवगांव येथील जयश्रीराम माध्यमिक विद्यालयात संघटनेचे जिल्हा हिशोब तपासणीस किशोर मुथ्था यांच्या हस्ते मोरे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव रमेश कुलकर्णी, सहसचिव सचिन बोरुडे, भारत जावळे,निसार सय्यद, कैलास म्हस्के, देविदास ताके,बापूसाहेब गायकवाड, अशोक पंडित, दत्तात्रय निकम,सुभाष बर्डे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...