मराठा आरक्षण आंदोलनाचे रणशिंग फुंकण्याची शक्यता
चांदा / जलभूमी वृत्तसेवा
मराठा
आरक्षणासंदर्भात रणनिती ठरविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले
उद्या शनिवार दि. १२ रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याच्या भव्य
स्वागताची तयारी जिल्हातील तरुणांनी चालविली असून छत्रपती संभाजीराजे सोबत
जिल्ह्यातील मराठा समाज आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मराठा
आंदोलनाचे समन्वयक क्रांतीवीर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अशोक चव्हाण
यांनी दिली आहे.
मराठा समाजाला आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्या संदर्भात युवराज
छत्रपती संभाजीराजे यांनी महाराष्ट्रात आंदोलनाची हाक दिली आहे. या
संदर्भात राजे उदया दि. १२ रोजी नगर जिल्हयातील कोपर्डी येथे दुपारी दोन
वाजता येत असून त्या ठिकाणी ते जिल्हयातील सर्व समन्वयक मराठा संघटनाचे
पदाधिकारी, कोपर्डी ग्रामस्थ, पिडीतेचे कुटुंब यांच्याशी चर्चा करणार आहेत व
तेथून आंदोलनाचे रणशिंग फुकणार आहेत .त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण
मिळावे. यासाठी बलिदान देणाऱ्या गंगापूर तालुक्यातील काकासाहेब शिंदे
यांच्या निवासस्थानी जाऊन तेथेही भेट देणार आहेत. कोपर्डीभेटी दरम्यान
त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे . यासाठी जिल्हयातील सर्व समन्वयक ,
मराठा संघटनाचे पदाधिकारी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन
समन्वयक अशोक चव्हाण यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...