धक्कादायक- सतरा वर्षे वयाच्या तरुणीने गळफास घेवुन केली आत्महत्या - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

मंगळवार, ८ जून, २०२१

धक्कादायक- सतरा वर्षे वयाच्या तरुणीने गळफास घेवुन केली आत्महत्या

अत्याचार झालेल्या युवतीने संपविले जीवन, परिसरात उडाली खळबळ

अहमदनगर / जलभूमी वृत्तसेवा
----------------------------------

अत्याचार झालेल्या युवतीने मानसिक त्रासातून स्वत: चे जीवन संपविल्याची धक्कादायक घटना बोल्हेगाव परिसरात घडली.


या प्रकरणी पिडीत युवतीच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणार्‍या अज्ञात व्यक्तीविरूद्ध अत्याचार, बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोक्सो), आत्महत्येस प्रवृत्त करणे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोल्हेगाव परिसरात 17 वर्षीय युवती आपल्या आई- वडिलांसोबत राहत होती. या युवतीवर कोणीतरी अज्ञात इसमाने अत्याचार केला. यामुळे सदर युवती गर्भवती राहिली. अत्याचार झालेल्या युवतीला आपण गर्भवती राहिल्याचा धक्का बसला. या मानसिक त्रासातून तीने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन जीवन संपविले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...