कांडेकर हत्याकांडातील मुख्य आरोपी माजी सरपंचांची निघृण हात्या
सुपा / जलभूमी वृत्तसेवा
नारायण गव्हाण सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष प्रकाश कांडेकर
यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले व सध्या पॅरोलवर
सुटका झालेले नारायणगव्हाणचे माजी सरपंच राजाराम शेळके यांची गळ्यावर
धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यातआली आहे.
पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील माजी सरपंच राजाराम शेळके यांची
निघृण हत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शेळके त्यांच्या शेतात
काम करत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला
झाला त्यावेळी शेळके एकटेच होते. दुपारी एकच्या सुमारास त्यांच्यावर
मारेकर्यांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर वार करण्यात
आले. त्यात त्यांच्या मानेला गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने शिरुर येथील
खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन
झाले. आजची घटना ही मागील घटनेची पुनरावृत्ती तर नाही ना?
याबाबत ची हकीकत अशी की, १३ नोव्हेंबर २०१० रोजी पुणे-नगर रोडवरून नारायण
गव्हाण शिवारातून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी डोक्यात गोळ्या झाडून
कांडेकरांची हत्या केली. या हत्येमुळे गावात तणाव निर्माण झाला होता.
कांडेकरांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता त्यांच्या डोक्यातील गोळी
गायब करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक अशोकत
रजपूत यांनी १४ आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी
चौकशी अंती राजाराम शेळके मुख्य सुञधार म्हणून सिद्ध झाले होते .
राजाराम शेळके दहा वर्षापूर्वी नारायाणगव्हाणचे माजी सरपंच प्रकाश
कांडेकर यांच्या हत्याकांडातील आरोपी होते. त्यांच्यासह कांडेकर खून
प्रकरणात आणखी काही आरोपी होते. राजाराम शेळके आणि त्यांच्या मुलाला या
गुन्ह्यात शिक्षा लागली होती. कोरोना संसर्ग वाढल्याने त्यांना पॅरोलवर
सोडण्यात आले होते. पॅरोलची सजा उपभोगत असताना त्यांनी गावातील शेतात काम
चालू केले होते. काम चालू असतानाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.
त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शेळके यांचा खून म्हणजे बदला घेतल्याचाच
प्रकार असल्याची चर्चा झडत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...