एकाच गावात तिघांचा मृत्यू , गावावर शोककळा - JalBhumi | Jal Bhumi News | Latest News in Marathi | जलभूमी

Breaking

शनिवार, २६ जून, २०२१

एकाच गावात तिघांचा मृत्यू , गावावर शोककळा

चंद्रकला अहिरे, गोरक्षनाथ मनोहर, कौशल्य येळे यांचे निधन
 
तिळापुर / जलभूमी वृत्तसेवा

राहुरी तालुक्यातील तिळापूर येथील चंद्रकला गबाजी अहिरे ( वय 60 वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या मागे पती, दोन मुल, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
 

( मयत - चंद्रकला अहिरे )

दुसरी घटना याच गावातील गोरक्षनाथ महानोर ( वय 35 वर्ष ) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भाऊजाई असा मोठा परिवार आहे. तिळापुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे माजी संचालक यादव आचपळे यांचे ते भाचे होत.
 

( मयत - गोरक्षनाथ मनोहर )

तिसरी घटनाही तुळापूर येथील कौशल्य किसन येळे ( वय 75 वर्ष ) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असून तिळापुर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी माजी सदस्य गंगाधर येळे यांच्या मातोश्री होत.
 

( मयत - कौशल्य येळे )

एकाच गावातील तीन व्यक्तीचे निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपली कमेंट याठिकाणी लिहा...